YCMOU Admission  esakal
नाशिक

YCMOU Admission : मुक्‍तच्‍या प्रवेशासाठी 15 पर्यंत मुदतवाढ; गत वर्षीपेक्षा 70 हजाराने विद्यार्थिसंख्या वाढली

सकाळ वृत्तसेवा

YCMOU Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशप्रक्रियेला पुन्‍हा मुदतवाढ दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)ने मुदतवाढीचा निर्णय घेतल्‍यानंतर विद्यापीठाने शनिवारी (ता. ३०) निर्णय घेतला. सुधारित वेळापत्रकानुसार येत्‍या १५ ऑक्‍टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. (ycmou admission Extension till 15th september nashik news)

गेल्‍या शैक्षणिक वर्षाच्‍या तुलनेत सद्यःस्‍थितीत प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थिसंख्येत सत्तर हजाराने वाढ झालेली आहे. तसेच वाढीव मुदतीत आणखी विद्यार्थी प्रवेश घेणार असल्‍याने एकूण प्रवेशित विद्यार्थिसंख्येत आणखी वाढ होणार असल्‍याचे सांगण्यात आले.

राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या मुक्‍त विद्यापीठातर्फे दूरस्‍थ शिक्षण पद्धतीने पदविका, पदवी, पदव्‍युत्तर पदवीस्‍तरावरील विविध विद्या शाखांचे अभ्यासक्रम उपलब्‍ध करून दिलेले आहे. त्‍यामुळे समाजातील विविध वर्गातील घटकांना शिक्षणाच्‍या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत झालेली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यापूर्वीच्‍या निर्णयानुसार वाढीव मुदत शनिवारी (ता. ३०) संपत होती. त्‍यातच यूजीसीने घेतलेल्‍या निर्णयानंतर विद्यापीठ अधिकार मंडळाने प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्‍यानुसार येत्‍या १५ ऑक्‍टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरल्‍यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्राची मान्‍यता घेणे बंधनकारक राहणार असून, त्‍यासाठीदेखील मुदत दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT