YCMOU Latest marathi news esakal
नाशिक

YCMOU Admission : ‘मुक्‍त’च्‍या प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ; अभ्यासकेंद्र मान्‍यतेसाठी 26 पर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

YCMOU Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

सोमवारी (ता. ३१) नोंदणीची मुदत संपत असताना विद्यापीठाने विनाविलंब शुल्‍क ऑनलाइन अर्ज प्रवेश भरण्यास मुदतवाढ दिली आहे. (ycmou admission Extension till 20th August nashik news)

त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना २० ऑगस्‍टपर्यंत विनाविलंब शुल्‍क अर्ज भरता येईल. प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्‍यता घेण्यासाठी २६ ऑगस्‍टपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

दूरस्‍थ शिक्षण पद्धतीतून विविध विद्याशाखांचे अभ्यासक्रम यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठामार्फत उपलब्‍ध करून दिले आहेत. राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या या विद्यापीठातर्फे पदविका, पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जात आहेत.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड., बी. एड. (विशेष), प्रथम वर्ष एमबीए आदी अभ्यासक्रमांव्‍यतिरिक्‍त उर्वरित शिक्षणक्रमांना ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली असल्‍याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्‍यामुळे राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्‍क २० ऑगस्‍टपर्यंत भरता येईल. प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्राची मान्‍यता २६ ऑगस्‍टपर्यंत घेता येणार आहे.

प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सूचना..

* विद्यार्थ्यांनी संकेतस्‍थळावर उपलब्‍ध माहिती पुस्‍तिका वाचावी

* ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना अचूक माहिती भरावी

* निर्धारित मुदतीत प्रवेश अर्ज भरून निश्‍चित करायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT