maize price down.jpg
maize price down.jpg 
नाशिक

स्वप्न पाहिले 2,400 चे अन्‌ 'मका'ला भाव मिळतोय 1,400 चा!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (येवला) यंदा विक्रमी भाववाढ होऊन मकाचे दर थेट दोन हजार ते दोन हजार 100च्या आसपास गेल्याने शेतकरी सुखावले होते. किंबहुना या भावात दोन हजार 400 ते दोन हजार 500 पर्यंत दरवाढ होण्याचे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले. पण, जागतिक बाजारपेठ व कोरोनाच्या अतिक्रमणाने मकाचे भाव घटले असून, आजमितीला भाव एक हजार 400 ते एक हजार 500 पर्यंत आहेत. त्यामुळे येथे शासकीय आधारभूत किमतीने खरेदीसाठी मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

अजूनही अंदाजे 40 ते 45 टक्के मका विक्रीअभावी पडून 

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी औषध फवार ण्या करून या नैसर्गिक संकटावर मात करून मका पीक वाचविले. यासाठी मोठे  आर्थिक नुकसानही सोसावे लागले होते. अशातच अतिवृष्टी झाल्याने हातात आलेल्या मका पिकाचे नुकसान होऊन उत्पन्नात 30 ते 40 टक्के घटीला सामोरे जावे लागले होते. अशा अस्मानी संकटावर मात करून शेतकऱ्यांनी कसेबसे सोंगणी करून मका तयार केली. किंबहुना बाजाराची तेजी वाढून भाव अजून वाढतील, या आशेवर काही शेतकऱ्यांनी अद्याप मका विक्री केलेली नाही. अजूनही अंदाजे 40 ते 45 टक्के मका विक्रीअभावी पडून आहे. अशातच नवीन रब्बी हंगामातील मकाही चांगल्या प्रमाणात तालुक्‍यात येत आहे. 

प्रतिक्विंटल सरासरी तब्बल 600 रुपये इतकी घसरण 

महिन्यापूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मकाला कमाल दोन हजार 145, तर सरासरी दोन हजार 100 रुपये भाव मिळत होता. मात्र, आज प्रतिक्विंटल 
दर किमान एक हजार 410 तर कमाल एक हजार 585, तर सरासरी एक हजार 500 रुपये भाव मिळत असल्याने प्रतिक्विंटल सरासरी तब्बल 600 रुपये इतकी घसरण 
झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ज्यांनी मका विकला ते नफ्यात असून, ज्यांनी साठवून ठेवला ते मात्र, मनस्ताप व्यक्त करत आहेत. आता शेतकऱ्यां ना आधारभूत खरेदीचा आधार वाटत आहे. शासनाने एक हजार 760 रुपये दर जाहीर केल्याने येथे दरवर्षीप्रमाणे खरेदी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

तहसीलदारांना साकडे... 

तालुक्‍यातील बोकटे येथील शेतकरी, विविध शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांनी मंगळवारी (ता. 18) नायब तहसीलदार राजेंद्र राऊत आदींना निवेदने देऊन खरेदी-विक्री संघात खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकरीवर्गाकडे हजारो क्विंटल मका विक्रीअभावी अजून पडून असल्याने लवकरात लवकर शासकीय आधारभूत किंमत एक हजार 760 रुपये दराने मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे. बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे, संघाचे सचिव बाबा जाधव यांनाही निवेदन दिले. भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष संभाजी दाभाडे, तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष हितेश दाभाडे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष किरण दाभाडे, प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष हरिभाऊ महाजन, वसंतराव झांबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष श्रावण देवरे, शेतकरी संघटना अध्यक्ष अरुण जाधव, शिवसेना अंदरसूल गटप्रमुख बापूसाहेब दाभाडे, भाऊसाहेब कदम, विजय दाभाडे, सुदामराव दाभाडे, चांगदेव दाभाडे, कचरू साताळकर, नरेंद्र दाभाडे, भानुदास मोरे आदींनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे. 

भाव कोसळत असल्याने व येवल्यात विक्रमी उत्पादन निघाल्याने मका खरेदी होणे आवश्‍यक आहे. आम्ही सर्व संचालक मंडळ लवकरच शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन येवला तालुक्‍यात मका खरेदी केंद्र सुरू करण्या साठी प्रयत्नशील आहोत. - दत्तात्रेय आहेर, अध्यक्ष, येवला तालुका खरेदी-विक्री संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT