Nashik ZP CEO Ashima Mittal esakal
नाशिक

Clean Survey Scheme | स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल : ZP CEO आशिमा मित्तल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र शासनामार्फत १९ नोव्हेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अभियान राबवण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्यांत झालेल्या जिल्ह्यात ग्रामपंचायतींची स्वयं मूल्यांकन भरण्याची कार्यवाही करण्यात येत असून यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के काम झाले आहे. राज्यात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा पडोळ यांनी दिली. (ZP CEO Ashima Mittal statement about Nashik District Top in State in Clean Survey Nashik news)

दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये बदल करून आता नव्या स्वरूपात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वमूल्यांकनाद्वारे सहभागी होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ची प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायतींचे स्वयंमूल्यांकन व पूर्व पडताळणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ मे ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्हास्तरीय मूल्यांकन होणार आहे.

ग्रामपंचायतींचे स्वयंमूल्यांकन व पूर्व पडताळणीमध्ये गावातील कुटुंब स्तरावरील आणि सार्वजनिक स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन व जाणीव जागृती क्षमता बांधणीअंतर्गत स्वच्छतेच्या घटकांच्या आधारे ई- ग्राम स्वराज्य पोर्टलवर ग्रामपंचायतीने प्रश्नावली भरून स्वयंमूल्यांकन करायचे आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ चा मुख्य उद्देश जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर स्पर्धा निर्माण करून ओडीएफ प्लस मॉडेल घटकाबद्दल समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

या माध्यमातून जास्तीत- जास्त गावे ओडीएफ प्लस होण्यास मदत होणार आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर आणि राष्ट्रीयस्तरावर अशा तीन श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. ५०० गुण, प्रत्यक्ष निरीक्षणासाठी ग्रामपंचायतींची स्वतंत्र पडताळणी मूल्यांकनामध्ये सेवा स्तर प्रगतीसाठी करण्यात येणार आहे.

"स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानात लोकसहभाग वाढवणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांबाबत जनजागृती करणे, गावागावांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे, गावांचा सहभाग वाढवणे हा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व गावांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अभियानात सहभागी होऊन स्वच्छतेची व्याप्ती वाढवावी."

- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT