Nashik ZP News  esakal
नाशिक

ZP Employees Transfer: जि. प. आरोग्य विभागातील बदल्या वादात; दाखल झालेल्या 9 प्रमाणपत्रांची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा

ZP Employees Transfer : जिल्हा परिषदेतील नियमित बदली प्रक्रीया सुरू होण्याअगोदरच रातोरात विभागातून झालेल्या बदल्या वादात सापडण्याची शक्यता आहे. रातोरात झालेल्या या कर्मचारी बदल्यांमध्ये दाखल झालेल्या प्रमाणपत्राबाबत तक्रारी झाल्याने या प्रमाणपत्राची चौकशी सुरू झाली आहे.

चौकशीत प्रमाणपत्र बोगस आढळल्यास सर्व बदल्या रद्द करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी सांगितले. (ZP Controversy over health department transfers Investigation of 9 certificates filed underway Nashik News)

गत आठवड्यात जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचारी बदल्यांची कारवाई होण्यापूर्वी विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. अगदी रातोरात डझनभर बदल्या करण्यात आल्या आहेत.

या सर्व विनंती बदल्या असून यात कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, घटस्फोट, विधवा प्रमाणपत्र जोडले आहेत. प्रामुख्याने या बदल्यांमध्ये कर्मचाऱ्यांना नाशिक तालुक्यातच पदस्थापना देण्यात आलेली आहे.

सदर तालुक्यातील सर्वच जागा भरत, इतर आरोग्य केंद्रामधील जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. यासह दाखल झालेल्या प्रमाणपत्राबाबत मोठ्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. तसेच यातील अनेक बदल्या सोईने करून घेतल्याचा आरोप विभागातीलच कर्मचाऱ्यांनी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे आरोग्य विभागातील रातोरात झालेल्या बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. वाढत्या तक्रारींची दखल घत मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व बदल्यांकरिता दाखल झालेल्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.

त्यानुसार या रातोरात झालेल्या बदल्यांची चौकशी विभागाकडून सुरू असून कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच यासाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या ९ हून अधिक वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी करण्यासाठी सदर प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे.

प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन अहवाल आठवडाभरात दाखल होण्याची शक्यता आहे. यात प्रमाणपत्र बोगस असल्याचे निर्दशनास आल्यास थेट बदल्या रद्द करून कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. नेहते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT