Dada Bhuse
Dada Bhuse esakal
नाशिक

Nashik News : ZPतर्फे लाभार्थ्यांना 700 सायकली, 80 चारचाकी वाहने दादा भुसेंच्या हस्ते वाटप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनांसह विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर गुरुवारी (ता.९) झाले. (ZP distributes 700 bicycles 80 four wheelers to beneficiaries by Dada Bhuse Nashik News)

सायकलचे वाटप झाल्यानंतर आनंदाने सायकल चालवित असलेल्या विद्यार्थिनी.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते,

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आदी उपस्थित होते.

समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून चारचाकी वाहने पुरवली जातात. त्यासाठी जिल्ह्यातील ११५ व्यक्तींनी अर्ज केला होता. त्यातून लकी ड्रॉ पद्धतीने ८० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

तसेच, शाळेत येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनींनी सायकल वाटप करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातील एक हजार २३४ विद्यार्थिनींनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर केला. त्यातील ७०० विद्यार्थिनींची लकी ड्रॉद्वारे निवड झाली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आरोग्य विभागाच्या दिमतीला नऊ रुग्णवाहिका

जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या दीड कोटी रुपये निधीतून नऊ अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचे लोकार्पण पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले.

१३ ते १८ वर्षे जुन्या झालेल्या रुग्णवाहिका रद्द करून या गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर (ता. निफाड), शिंदे (ता. नाशिक), धामणगाव व खेड (ता. इगतपुरी), रोहिले (ता. त्र्यंबकेश्वर), कुळवंडी (ता. पेठ), चिखलओहोळ (ता. मालेगाव), अंदरसुल (ता. येवला), वडनेरभैरव (ता. चांदवड). या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT