accident news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News : वाढदिवसाच्या दिवशीच द्यावा लागला अखेरचा निरोप; मोटारसायकल व कार अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : बेहेड (ता. साक्री) येथील उमेश (सोनू) तोरवणे व सुमीत पवार हे दोघे दुचाकीवरून (एमएच १५, बीसी २३४५) जात होते.

सणसवाडी हद्दीत या दोघांना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एमएच १४, एचएम ९५९९) जोरदार धडक दिली. दुचाकीला कारची धडक बसल्याने दुचाकीवरील सोनू ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. (person killed in bike car accident nandurbar news)

हा अपघात रविवारी मध्यरात्री घडला. सोनू नोकरीनिमित्त पुणे येथे बहिणीकडे राहात होता. सोमवारी त्याचा वाढदिवस असल्यामुळे गावी (बेहेड, ता. साक्री) यायचे होते. मित्राला घेऊन दुचाकीवरून पुणे येथे जात असताना अपघात घडला. सोनू साधारण शेतकरी कुटुंबातील दोन विवाहित बहिणींचा एकुलता भाऊ होता.

सोनूच्या अशा जाण्याने संपूर्ण गाव सुन्न झाले असून, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. वाढदिवसाच्याच दिवशी निरोप देण्याचा प्रसंग आई-वडील, बहिणी, आप्तेष्टांवर येऊन ठेपला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोनूचा मित्र सुमीत विकास पवार (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी गोकूळ भीमराव जाधव (रा. आळंदी फाटा, लोणीकंद, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, कारचालक सुनील ऋषिकेश बेंडभर (रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश मळेकर पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT