bridge wall damage  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दोंडाईचा उड्डाणपुलाचे कठडे तुटल्याने प्राणहानीची शक्यता; अनेकदा अपघात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा येथील उड्डाणपुलाचे कठडे जागोजागी तुटल्याने मोठी प्राणहानी होण्याची चिन्हे असून, कधीही मोठा अपघात घडू शकतो अशी आजची स्थिती आहे.

त्यात उंचीवर एकाच ठिकाणी जवळपास तीस फुटांपर्यंत कठडे तुटले आहेत, तसेच सिमेंट खांब निखळत असल्याचे दिसत असून, संभाव्य मोठा धोका निर्माण झाला आहे. (possibility of accident due to Dondaicha flyover damaged Dhule News )

ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण पुलाला कठडे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस उड्डाणपुलाची स्थिती गंभीर होत असून, त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

उड्डाणपुलाचे साधारणतः जवळपास १०० फूट उंचीवर बांधकाम झाले आहे. या उंचीवर सिमेंटचे खांब उभे करत फक्त लोखंडी पाइप लावून काम केले आहे. त्या कठड्याना खूप मोठा आधार आहे असेही नाही. जोरात वाहन धडकले की वाहन सरळ १०० फूट खाली जाऊ शकते.

या उड्डाणपुलावरून रोज शेकडो अवजड वाहनांसह लहान-मोठी वाहने धावत असतात. तसेच गुजरात व मध्य प्रदेशात याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे उड्डाणपुलावर कायम वर्दळ असते. अशा स्थितीत अपघात झाला तर वाहन खाली जाऊ शकते. पुलाच्या मध्यभागी रेल्वे वीजवाहक तार आहे.

आजूबाजूला १०० फुटांवर दरी आहे. अशा स्थितीत रेल्वे उड्डाणपुलाचे कठडे आठ ते दहा ठिकाणी तुटलेले आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची चिन्हे असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व पुलाच्या कठड्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

उड्डाणपुलाला ३० फूट कठडे नाहीत तेथे जैन सोशल ग्रुपने बांबू लावून लाल रिबन बांधण्यात आला होता. तो काही दिवस राहिला. कालांतराने तोही गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT