After two hours of incessant rain, standing water in a field planted with onion seeds esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rain News : आता नदी-नाले वाहू दे देवा.. एवढा बरस..! 35 दिवसांनी पावसाचे पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा

Dhule Rain News : खेडोपाडी धोंडी धोंडी पाणी मागितले. महिला मुलांनी घरोघरी जाऊन भाकरीतुकडा मागितला. तो अंगणात खाल्ला. महादेवाची पिंडी आणि गणपतीची मूर्ती पाण्यात बुडवून देवांना संकटात टाकले.

एवढेच नाही तर बेडका-बेडकीचे लग्न लावले. अखेर त्याला दया आली अन् गोकुळाष्टमीला धो धो पाऊस घेऊन आला, असे म्हणत धुळे तालुक्यात पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी अत्यानंदित झाला आहे. मात्र दुष्काळाचे संकट टळलेले नाही. तात्पुरते चाऱ्याचे संकट टळले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच. नदीनाले भरून वाहतील, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. (rain in dhule after 35 days news)

गोकुळाष्टमीला सायंकाळी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जेसेसह धो धो पावसाचे आगमन झाले. या पावसाळ्यातला हा पहिलाच पाऊस, जो मेघगर्जेनेसह आणि विजांच्या कडकडाटासह दाखल झाला. गोकुळाष्टमीच्या मध्यरात्रीही पाऊस कोसळला. शुक्रवारी सकाळी आठपासून ते दहापर्यंत संततधार पावसाने शेतकरी सुखावला.

दुष्काळ डोक्यावर आहेच...

एक माहिना उशिरा पेरण्या. जुलैत पीक जगविण्यापुरता पाऊस आणि ऑगस्ट पूर्णतः कोरडा काढला. यामुळे ७० टक्के पिके करपली आहेत. जी काही शेष आहेत ती विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्यावर तग धरून होती. या पिकांसाठी हा पाऊस मोठा फलदायी ठरणार आहे. दुष्काळाचे सावट डोक्यावर आहेच. अद्याप चाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा...

धुळे जिल्ह्यासह खानदेशातील नदी-नाले कोरडे आहेत. जोरदार आणि आठ दहा दिवस सातत्यपूर्ण पावसानेच नदी-नाले प्रवाही होतील. तेव्हाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शेतकऱ्यांचे आता मोठ्या आणि सातत्यपूर्ण पावसाकडे लक्ष लागून आहे.

आता सारी मदार रब्बीवर

खरिपाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. उत्पादन निघणार नाही. लागलेला खर्चही निघणार नाही. आता उत्तरार्धाच्या पावसाने कृपा केल्यास नदी-नाले वाहतील अन् रब्बीचा हंगाम घेता येईल. जगण्याची उमेद वाढेल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT