Rains arrived in the city on Wednesday.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rain News : धुळ्यात पावसाचे ‘कमबॅक’! महिन्यानंतर हजेरी; पेठ भागात वीज कंपनी ‘फेल’

सकाळ वृत्तसेवा

Dhule Rain News : महिन्यापासून ओढ दिलेल्या मोसमी पावसाचे शहरासह परिसरात बुधवारी (ता. ६) सायंकाळी ‘कमबॅक’ झाले. दुपारी सव्वाचारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली.

सायंकाळी साडेसहापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. बुधवारी दिवसभरात कमाल ३० आणि किमान १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पाऊस नसल्याने शहर आणि परिसरातील शेतकरी, व्यावसायिक तसेच नागरिक हवालदिल झाले होते. सव्वादोन तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. (Rainfall in city on Wednesday dhule news)

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तथापि, पावसामुळे शहरात अनेक भागांतील वीजपुरवठा सुमारे तीन तास खंडित झाला.

विशेषतः व्यापारी पेठ, सर्वाधिक चलनवलन असलेल्या शहरातील मध्यवर्ती पेठ भागात, झाशीची राणी पुतळा चौक परिसरात वीज कंपनी फेल झाल्याचे पुन्हा सिद्ध झाले. किरकोळ पाऊस, वारा आला तरी पेठ भागात तासन् तास वीजपुरवठा खंडित होतो.

याप्रश्‍नी आमदार फारूक शाह यांनी गेल्या वेळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तीच वेळ आता त्यांच्यावर पुन्हा आली आहे. पेठ भागात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी आमदार शाह यांना बुधवारी साकडे घातले गेले.

जिल्ह्यात या वर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही महिनाभर उशिरा पावसाचे आगमन झाले. मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. जून कोरडा गेला. प्रत्यक्षात पावसाचे मृग नक्षत्र संपल्यानंतर आषाढी एकादशीला पावसाचे आगमन झाले. जूनमध्ये पावसाअभावी पेरण्या लांबल्या. १ जुलैपासून पेरण्या सुरू झाल्या. प्रत्येक भागात कमी-अधिक पाऊस होता. रखडलेल्या पेरण्या १५-१६ जुलैपर्यंत पूर्ण झाल्या.

पेरण्या झाल्यानंतर मुसळधार पाऊस झालेला नाही. मार्च, एप्रिल आणि मेमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पावसाळ्यात पाऊस लांबला. आषाढी एकादशीला पावसाचे आगमन झाले. तेही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाण होते. ऑगस्टमध्ये पावसाने उघडीप दिली. महिन्यापासून पावसाने पूर्णतः दडी मारली होती.

लांबलेला पाऊस बुधवारी सायंकाळी तब्बल सव्वादोन तास झाल्याने शहरासह परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार शहरासह जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस हलका-मध्यम पाऊस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

साक्रीत अनेक गावांत पाऊस

काही दिवसांपासून पिंपळनेरसह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. यामुळे या भागातील धरण क्षेत्रात पाणी वाढले आहे. साक्री तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने विविध जलप्रकल्पांमधील साठा घटला.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मात्र, पश्चिम पट्ट्यात पाऊस होऊ लागल्याने लाटीपाडा धरण सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. गेल्या वर्षी १२ जुलैला लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र यंदा तब्बल २० ते २२ दिवस उशिरा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT