Both communities during lunch  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पोलिसांना सहकार्य करत दोन्ही समुदायांचे स्नेहभोजन; त्या घटनेनंतर समेट!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : देवपूरमधील मोठ्या पुलाजवळील पांचाळवाड्यात दोन समुदायांमध्ये वाद झाला होता.

नंतर कायदा व सुव्यवस्थेकामी पोलिसांना सहकार्य करत दोन्ही समुदायांतील प्रतिनिधींनी स्नेहभोजन करत एकतेचा संदेश दिला. (Representatives from both communities shared message of unity over lunch dhule news)

देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लहान मुलांच्या भांडणावरून पांचाळवाड्यात काही दिवसांपूर्वी दोन समुदायांमध्ये वाद झाला.

घटनेच्या अनुषंगाने या भागात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, तसेच पुन्हा अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दोन्ही समुदायांतील नागरिकांच्या सहभागाने शांततेकामी सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तीत सकारात्मक निर्णयासह पांचाळवाड्यातील दोन्ही समुदायांनी एकत्रित स्नेहभोजनाचे आयोजन केले.

त्यांच्याकडील आमंत्रणानुसार आणि पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, देवपूरचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूरचे सहाय्यक पोलिस अधिकारी सचिन बेंद्रे व कर्मचारी स्नेहभोजनास उपस्थित होते. या माध्यमातून शहरात सलोख्यासह शांततेबाबत आदर्शवत संदेश देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT