Sakshi Jagdale receiving the medal from dignitaries.
Sakshi Jagdale receiving the medal from dignitaries. esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : हमालाच्या मुलीची यशोगाथा! राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत कमाल

सम्राट महाजन

तळोदा (जि. नंदुरबार) : कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यास यश हमखास मिळतेच, गरज असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती व यशाकडे नेणाऱ्या महत्त्वाकांक्षेची. या दोन्हीचा संगम झाल्यास यशाला गवसणी घालता येते हे साक्षी जगदाळे या सतरावर्षीय मुलीने दाखवून दिले. (Sakshi Jagdale win third prize in state level Wushu competition nandurbar news)

साक्षीचे वडील हमाली करीत कुटुंबाचा गाडा हाकतात, मात्र विपरीत परिस्थितीशी संघर्ष करीत एका हमालाच्या मुलीने राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवीत कमाल केली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

साक्षी जगदाळे हिचे जीवन लहानपणापासून गरिबीत गेलेले आहे. साक्षीचे वडील सतीश जगदाळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हमालीचे काम करतात. कुटुंबात साक्षीची आई मनीषा जगदाळे, लहान बहीण आहे. तिचे पाचवीपर्यंतचे शिक्षण मिशन हायस्कूलमध्ये झाले.

लहानपणापासून खेळाची आवड असल्याने दुसरीपासूनच तिने कराटेचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. साक्षीने सहावीत प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूलला प्रवेश घेतला. तिने शिक्षणासोबतच कराटेचा सराव सुरूच ठेवला आणि कराटेच्या विविध स्पर्धेत विभागापर्यंत शाळेचे प्रतिनिधित्व केले.

साक्षीने दोन वर्षांपूर्वी दीपाली साळुंखे यांच्या दीप स्पोर्टस ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी कराटेसोबतच ज्यूदोचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. मागच्या वर्षी श्री. शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयात तिने अकरावीला प्रवेश घेतला आणि बॉक्सिंग, कराटे, कुस्ती खेळांचे मिश्रण असलेल्या वुशू खेळाकडे वळत, वुशूच्या सरावाला सुरवात केली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

साक्षीने वुशूमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर विभागाच्या स्पर्धेतदेखील तिने प्रथम क्रमांक मिळवत नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपली जागा पक्की केली. राज्यस्तरीय स्पर्धेतदेखील साक्षीने जोरदार खेळ करीत दोन सामने जिंकून सेमिफायनलमध्ये स्थान मिळवले.

मात्र दुर्दैवाने तिला सेमिफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. परंतु तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात तिने यश मिळविले. तिच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन, कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन यांनी तिचे कौतुक केले.

तिच्या यशात आई-वडिलांचा मोठा वाटा असून, प्राचार्य अजित टवाळे, उपप्राचार्य अमरदीप महाजन, प्रशिक्षिका दीपाली साळुंखे, क्रीडाशिक्षक सुनील सूर्यवंशी, शिक्षिका रेखा चव्हाण यांचे तिला वेळोवेळी सहकार्य मिळते.

अल्पावधीतच गगनभरारी

साक्षी जगदाळेने सहा महिन्यांपूर्वी वुशूच्या सरावाला सुरवात केली आहे. मात्र अल्पावधीतच या खेळात तिने मोठी मजल मारली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिच्याकडे वुशूचे पुरेसे साहित्यदेखील नाही.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना होण्याअगोदर तिने काही रक्कम जमवत, स्पर्धेसाठी आवश्यक ते साहित्य विकत घेतले आणि नांदेडला रवाना झाली. एकूणच परिस्थिती विपरीत असली तरी संघर्षाला कठोर मेहनतीची जोड तिने देत अल्पावधीत गगनभरारी मारली हे विशेष.

"लहानपणापासून खेळांची आवड होती. सुरवातीला स्वरक्षणासाठी कराटेकडे आकर्षित झाले होते. त्यानंतर वुशू या खेळात आवड निर्माण झाली. प्रामाणिक मेहनत घेत विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. भविष्यात ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मी सराव करीत आहे." -साक्षी जगदाळे, वुशू राज्यस्तरीय खेळाडू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT