school was held there by hanging black board on gate of office of Group Education Officer dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या गेटला फळा टांगून भरली शाळा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तालुक्यातील साहूर येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांनी शिंदखेडा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून विद्यार्थी व पालकांसमवेत निषेध आंदोलन केले.

सुमारे दोन तास आंदोलन सुरू राहिले. शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाच्या गेटला फळा टांगून तेथेच शाळा भरविण्यात आली होती. (school was held there by hanging black board on gate of office of Group Education Officer dhule news)

साहूर येथे पहिली ते चौथी वर्गाची जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. येथे कायमस्वरूपी दोन शिक्षकांची नेमणूक असणे गरजेचे आहे; परंतु तीन वर्षांपासून या शाळेला एकच शिक्षक एक ते चार या वर्गांसाठी शिक्षण देत होता. त्याचीही बदली झाली. नवीन शिक्षक आजपर्यंत रुजू झाला नाही. उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा सुरू झाली.

तेव्हापासून विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. या संदर्भात धमाणे गटातील जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांनी अनेक वेळा आवाज उठविला. तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत आठ दिवसांत कायम शिक्षक मिळाला नाही तर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, शिंदखेडा यांच्या दालनाला कुलूप लावणार, असा इशारा दिला होता.

तरीही प्रशासन जागे झाले नाही. साहूरसह धमाणे गटातील सर्व शिक्षकांची पदे तत्काळ भरावीत म्हणून शासन आपल्या दारी कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवून निषेध केला. तरीही समस्या जशीच्या तशीच आहे म्हणून सोमवारी (ता. ३१) सकाळी दहाला प्रशासनाचा निषेध म्हणून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे, विद्यार्थी व पालकांसह सर्वांनी कुलूप लावून निषेध आंदोलन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

साहूर शाळेला कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे, शिक्षक द्या, शिक्षक द्या, साहूर गावाला शिक्षक द्या, अशा घोषणा देण्यात आल्या.कार्यालयाच्या दालनाला फळा लावून तेथेच विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात आली. कायमस्वरूपी शिक्षक नेमणूक केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आंदोलनाबद्दल माहिती दिली. श्री. साळुंखे यांनी तत्काळ कायमस्वरूपी एक शिक्षक नेमणूक करतो व सायंकाळपर्यंत दुसरा कायमस्वरूपी शिक्षक येत नाही तोपर्यंत एक तात्पुरता शिक्षक नेमणूक करतो, असे आश्वासित केले व नेमणुकीचे आदेश काढून नेमणुकीचे पत्र पाठवतो, असे सांगितले. गटशिक्षणाधिकारी डॉ. पाटील यांनी शिक्षक नेमणूकपत्र दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सरपंच गुलाब सोनवणे, शालेय समितीचे अध्यक्ष शानाभाऊ शिरसाठ, सुरेखा सोनवणे, कौतिक कोळी, रमण कोळी, पुंडलिक कोळी, सुनील भिल, संजय कोळी, सेना भिल, हेमराज कोळी, अशोक रोकडे, चिंधा कोळी, कन्हय्या कोळी, पंकज कोळी, विलास कोळी, दीपक वडार यांच्यासह अनेक विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT