A bus that goes to the government's door without taking the students  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Shasan Aplya Dari : विद्यार्थ्यांची चुकली शाळेची वारी..! बसच्या व्यस्ततेमुळे प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Shasan Aplya Dari : धुळे जिल्ह्यात सोमवारी (ता. १०) शासन आपल्या दारी हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी झाला. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे योगदान आणि नियोजन महत्त्वपूर्ण ठरले, पण या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे अधिक हाल झाले.

सर्वच बहुतेक बस त्याच कार्यक्रमासाठी मोफत धावल्या अन् शाळा व महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तासन् तास बसची वाट बघावी लागली. प्रवाशांचेही हाल झाले. (shasan aplya dari program Students and commuters suffer due to less bus dhule news)

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी अवघा जिल्हा शहरात लोटला. यासाठी बसच्या माध्यमातून मोफत सुविधा उपलब्ध झाली होती. प्रत्येक गावात बस दाखल झाली होती. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक सारीच शासकीय यंत्रणा बस गावापर्यंत घेऊन आले. तीनशेपेक्षा अधिक बस धावल्या. या बसचा फटका विद्यार्थी व प्रवाशांना बसला.

शाळा व महाविद्यालयात जाण्याची वेळ आणि कार्यक्रमाकडे ग्रामस्थांना नेण्याची वेळ जवळपास एकच होती. विद्यार्थ्यांना बस उपलब्ध झाल्या नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देवभाने फाटा, सरवड फाटा, सोनगीर, वाघाडी, कलमाडी फाटा, शिरूड चौफुली, मुकटी, सांजोरी फाटा, लामकानी, कुसुंबा, नेर, खेडे आदी महामार्गालगतच्या गावांच्या बसस्थानकांवर गर्दी दिसून आली. बस न थांबता निघून जात होत्या. देवभाने फाट्यावर कापडणे, देवभाने व धनूरच्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ बसची वाट बघावी लागली.

दरम्यान, बहुतांश विद्यार्थी व प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागला. विद्यार्थी मोटारसायकलींची लिफ्ट घेत शाळा-महाविद्यालयांमध्ये पोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT