esakal
esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Election News : गणेशोत्सवात इच्छुकांकडून आगामी निवडणुकांची चाचपणी; ग्रामीण मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत

जगन्नाथ पाटील

Dhule Election News : गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण भागातील गणेशमंडळांना वर्गणी संकलित करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्स्व अंतिम टप्प्यात आला आहे. मंडळांना आर्थिक रसद राजकीय मंडळींकडून पुरविली जात असल्याने मंडळांवरील दुष्काळाचे गडद सावट कमी होण्यास मोठी मदत होत आहे.

धुळे ग्रामीणमध्ये तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक गाव प्रत्येक मंडळाला भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे. या माध्यमातून शक्तिप्रदर्शन आणि चाचपणी सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी गणेशोत्सव मोठी पर्वणी ठरत आहे. धुळे ग्रामीणमधून भाजपतून जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे इच्छुक आहेत. (Signs of three way election in Dhule Rural Constituency dhule news)

बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा इंदूबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनीही जोरदार संपर्क सुरू ठेवला आहे. त्यांची पत्नी शालिनी भदाणे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.

भदाणे नेमके कोणत्या गटाच्या शिवसेनेत आहेत हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. मात्र प्रसंगी अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांनीही जोरदार लोकसंपर्क सुरू ठेवला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दिलजमाई झाली आहे. त्यांची सध्या मोट बांधली गेली आहे. म्हणून राष्ट्रवादीकडील इच्छुक सध्या अज्ञातवासात आहेत.

आर्थिक मदत गुलदस्त्यात

गणेशोत्सवाच्या माध्यमातून इच्छुक प्रत्येक गावापर्यंत पोचत आहेत. दररोज किमान दहा-वीस गावांमध्ये आरतीसाठी पोचत आहेत. इच्छुकांकडून बऱ्यापैकी आर्थिक मदत होत आहे. दुष्काळातही गणेशमंडळांना सुगीचे दिवस आले आहेत. आरतीप्रसंगी त्यांचे समर्थकही अधिक संख्येने उपस्थिती देत आहेत.

गणेशमंडळे नेमकी कोणाची समर्थक?

प्रत्येक गावातील प्रत्येक गणेशमंडळ तिघाही इच्छुकांना आरतीसाठी आमंत्रित करीत आहेत. देणगी घेत आहेत. ही मंडळे नेमकी कोणाची समर्थक आहेत, हे समजणे कठीणच आहे. मात्र तूर्त तरी आर्थिक मदत पदरात पाडून घेत आहेत, हेही कमी नव्हे. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि आगामी निवडणुकांमधील इच्छुकांमुळे गणेशोत्सवाच्या धामधुमीत रंगत निर्माण झाली आहे, हे जोरकसपणे चर्चिले जात आहे.

एक गाव एक गणपती मंडळाला अकरा हजार

बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी प्रत्येक गावातील एक गाव एक गणेशमंडळाला अकरा हजारांचे पारितोषिक घोषित केले आहे. या बक्षिसाचा बऱ्या‍चशा गावांनी फायदा घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT