sc.jpg 
उत्तर महाराष्ट्र

स्मार्टसिटीचे खर्चही स्मार्टच!.

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शहरात स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेली कामे म्हणजे नाकापेक्षा मोती जड या प्रकारात मोडली जात आहेत. त्याला कारण म्हणजे कंपनीकडून गेल्या चार वर्षांत एकही ठोस असे काम तर झाले नाही; परंतु अधिकाऱ्यांच्या प्रवासावर तब्बल 32.49 लाख रुपये खर्च, तर चहापान व नाश्‍त्यासाठी चार लाख 25 हजार रुपयांचा खर्च झाला आहे. यावरून स्मार्टसिटी कंपनीचे अधिकारी नेमके करतात काय, असा सवाल उपस्थित होत आहे. स्मार्टसिटींतर्गत शहरात 52 प्रकल्पांचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार 200 रुपयांची तरतूद करण्यात आली. 

विविध प्रकल्पांवर 29.52 कोटींचा खर्च...

आतापर्यंत प्रकल्पांवर 29.52 कोटींचा खर्च झाला. त्यात विद्युत शवदाहिनीवर दोन कोटी 43 लाख रुपये, कालिदास कलामंदिर नाट्यगृहाच्या नूतनीकरणावर नऊ कोटी 46 लाख रुपये, महात्मा फुले कलादालनाच्या नूतनीकरणावर दोन कोटी 75 लाख रुपये, नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणावर एक कोटी 24 लाख, अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान स्मार्ट रस्त्यावर आतापर्यंत 13 कोटी 52 लाख, तर हरित क्षेत्र विकासासाठी नऊ लाख सहा हजार रुपयांचा खर्च झाला आहे. स्मार्ट रस्त्याचे काम पावणेदोन वर्षांपासून सुरू आहे. काम तर पूर्ण झाले नाहीच, शिवाय संबंधित ठेकेदाराला तीन कोटी 89 लाख रुपये अतिरिक्त अदा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिर व फुले कलादालनाचे काम पूर्ण झाले असले तरी त्यानंतरच्या अतिरिक्त खर्चामुळे प्रकल्प वादात सापडले. प्रस्तावित नगररचना परियोजनेचा वाद न्यायालयात पोचला आहे. 

चहापानावर चार लाख 25 हजार रुपये खर्च...

एकंदरीत स्मार्टसिटी प्रकल्पांच्या कामाबाबत नागरिकांमध्ये नाराजी असताना 
आता कंपनीच्या प्रवासखर्च व न्याहारीच्या खर्चाने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. 22 जानेवारीला संचालक मंडळाच्या बैठकीसमोर खर्चाचा अहवाल सादर करण्यात आला. त्यात स्मार्ट कंपनीने खर्च झालेल्या 40 कोटी 83 लाखांचा हिशेब दिला असून, त्यात 11 कोटी 30 लाख रुपये प्रशासकीय खर्च दाखविला आहे. यात वेतनापोटी दोन कोटी 31 लाखांचा खर्च झाला असून, वाहन व प्रवासासाठी 32 लाख 49 हजार रुपये खर्च झाला आहे. चहापानावर चार लाख 25 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

पैशांची उधळपट्टी... 
स्मार्टसिटीचे एकही काम स्पष्टपणे दिसत नसताना खर्च वाढत असल्याने वाद निर्माण झाले आहेत. केपीएमजी या सल्लागार कंपनीला सुमारे पाच कोटी रुपये अदा केले आहेत. सल्लागार कंपनीकडून कामात अनियमितता झाल्याची तक्रार स्मार्टसिटी कंपनीने यापूर्वीच केली आहे. आता प्रवास व चहापानाचा खर्च वादाला कारणीभूत ठरण्याची दाट शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT