Fallen wall of the school, on the other side a sign saying dangerous building.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जि.प. शाळेची दगडी भिंत शालेय वेळेत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सुरपान (ता. साक्री) येथील सुमारे ५० वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी जिल्हा परिषद शाळेच्या कौलारू वर्गखोलीची दगडी भिंत अचानक कोसळल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली.

सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे इमारत पुनर्बांधणीसाठी होत असलेल्या मागणीला केराची टोपली दाखविली जात असल्याने पालकांसह ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. (stone wall of ZP school collapsed during school hours dhule news)

सुरपान (ता. साक्री) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी या वर्गात सुमारे १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसून शिक्षण घ्यावे लागते, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांना कुठल्याही पद्धतीची इजा होऊ नये यासाठी यापूर्वीच जीर्ण झालेल्या इमारतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मात्र सातत्याने या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. बुधवारी (ता. २१) आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांवर काळाचा हा घाला घातला गेला, परंतु सुदैवाने वेळ आणि दैव या दोन्हीही गोष्टी बलवत्तर असल्यामुळे कुठल्याही प्रकारे हानी कुणाला पोचली नाही.

वर्गखोलीची दगडी भिंत अचानक कोसळली आणि समाजमाध्यमांवर या विषयाची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी (ता. २२) माजी खासदार बापू चौरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण तथा आरोग्य सभापती महावीरसिंह रावल, तालुक्याचे भूमिपुत्र तथा कृषी आणि पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

साक्री पंचायत समितीचे सभापती शांताराम कुवर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय ठाकरे, माजी सदस्य तात्या ठाकरे, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पन्न नांद्रे, सदस्य रमेश सूर्यवंशी, राजू चौरे, गटविकास अधिकारी सोनवणे यांच्यासह बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागातील अधिकारी तथा कर्मचारी हजर होत. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

धोकादायक इमारतीचा फलक

यापूर्वीच इमारत जीर्ण तथा धोकादायक असल्याचा फलक भिंतीवर लिहून ठेवण्यात आलेला आहे. कोणीही प्रवेश करू नये, असेदेखील या ठिकाणी लिहिले गेले आहे, मात्र इमारतीची व्यवस्था होत नसल्यामुळे अशा धोकादायत इमारतीतच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावावे लागतात. आतातरी गावातील विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात ज्ञानार्जन करण्यासाठी इमारतीची व्यवस्था प्रशासनाकडून होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

या वेळी सुरपान जिल्हा परिषद शाळेतील पाचही वर्ग नवीन मंजूर करण्यात येऊन बांधकाम करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण सभापती रावल तसेच कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी उपस्थित पालक आणि ग्रामस्थांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : भाषेची सक्ती केल्यास आम्ही शक्ती दाखवू - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT