sanket deore got mobile.jpg 
उत्तर महाराष्ट्र

#SundayMotivation : शाळा सुटल्यावर मुलांना रस्त्यावर महागडा मोबाईल दिसला...अन् मग काय...

दीपक खैरनार: सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबासन येथील मविप्र विद्यालयाची शाळा सुटल्यावर घरी जाताना सातवीच्या विद्यार्थ्यास रस्त्यात सापडलेला महागडा मोबाईल फोन परत केल्याने मोबाईलधारकाने मुलाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आजच्या काळातही ग्रामीण भागातील कुटुंबियांनी मुलांवर संस्काराचे रोपटे जतन करून ठेवल्याची भावना मोबाईलधारक रूपेश शहा यांनी व्यक्त करून दाखवली सदर विद्यार्थ्याचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.

झाले असे की....
नामपुर येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश शहा आणि दिपक सोनवणे हे अंबासन येथे आपल्या खाजगी कामानिमित्त शनिवारी (ता.२१) आले होते. काम आटपून दुचाकीने परतीच्या मार्गावर असतांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गावाजवळील शिरवाळ नाल्याजवळ रूपेश शहा यांच्या खिशातून मोबाईल केव्हा पडला ते त्यांना कळालेच नाही. याच वेळी येथील विद्यालयाची नुकतीच सुट्टी झाली होती. पाठीमागे शेतात राहणारे विद्यार्थी रस्त्यावर येत असतांना सातवीतील विद्यार्थी संकेत बळवंत देवरे याला रस्त्याच्या कडेला मोबाईल आढळून आला. संकेतला मोबाईलची थोडीशी माहिती असल्याने त्याने मोबाईल सुरू करून पहिला कॉल झालेल्या व्यक्तीला लावला असता गावातीलच धर्मेंद्र कोर यांनी उचलला. हा मोबाईल रस्त्यावर सापडल्याचे संकेतने सांगितले कोर यांनी त्याला त्याच ठिकाणी थांबण्याचे सांगून लागली रूपेश शहा यांच्याबरोबर आलेल्या दिपक सोनवणे यांना कळवले तोपर्यंत बरेचसे अंतर दुचाकीने पार केले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे खिशातून मोबाईल उसळून गेल्याची त्यांना कल्पनाही नव्हती त्यांनी त्वरित दुचाकी माघारी घेतली व संकेतपर्यंत पोहचले संकेतने सुरूवातीला मोबाईल खरच यांचाच आहे का अशी खात्री केली आणि मोबाईलमालक रूपेश शहा यांच्या ताब्यात दिला.

संकेतचे सर्वत्र कौतुक....

संकेतच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करीत शहा यांनी बक्षीस दिले. आणि पुन्हा नामपुरच्या दिशेने रवाना झाले. पंचक्रोशीत याबाबत माहिती होताच संकेतचे शाब्बासकीची थाप देत कौतुक केले जात आहे. संकेतच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे ते कमीच आहेत. तब्बल सोळा हजारांचा मोबाईल होता. आजही ग्रामीण भागातील कुटुंबियांची मुलांवर पडत असलेला संस्कारांचा पायंड कायम दिसून येतो. - रूपेश शहा, नामपुर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT