Recruitment esakal
उत्तर महाराष्ट्र

Talathi Bharti 2023 : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी 259 जागा; या संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Talathi Bharti 2023 : भूमिअभिलेख विभागामार्फत होणाऱ्या तलाठी (वर्ग क) संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ जुलै होती.

मात्र, अर्जाची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक आल्याने उमेदवारांना अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. १८) एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. (talathi bharti 2023 Deadline for applications is tonight dhule news)

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण २५९ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.

तलाठ्यांची राज्यात सुमारे चार हजारांवर ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे गाव पातळीवर विविध प्रकारचे कामकाज करणे अवघड होऊ लागले आहे. ते लक्षात घेऊन शासनाने रिक्त तलाठी पदे भरतीचा निर्णय घेतला. जिल्ह्यात २०५ जागांसाठी भरती प्रक्रिया आहे. त्यात ६७ जागा सर्वसाधारण, ६३ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पेसाअंतर्गत ४९ पदे रिक्त आहेत. नंदुरबार जिल्ह्यासाठी ५४ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यात सर्वसाधारण व महिलांसाठी प्रत्येकी १७ जागा राखीव आहेत. सर्वाधिक पेसाअंतर्गत ५२ पदे भरली जातील. अर्जदारांना एक दिवसाच्या मुदतवाढीमुळे मंगळवारी (ता. १८) रात्री ११.५५ या वेळेपर्यंत अर्ज सादर करता येतील.

मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार करू शकतील. उमेदवारांना https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर अर्ज करता येईल, असे भूमिअभिलेख विभागाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT