fall from caught.jpg
fall from caught.jpg 
उत्तर महाराष्ट्र

तीन वर्षांची 'ती' चिमुकली सर्वांचीच लाडकी...पलंगावर खेळत होती...अचानक....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वासननगर परिसरातील शांती वैभव सोसायटीत सध्या सर्वत्र शोककळा पसरली आहे. कारण  या ठिकाणी राहणाऱ्या हनुवटे कुटुंबातील तीन वर्षांची चिमुकली भाग्यश्री ही पलंगावर खेळत असताना अचानकपणे तोल जाऊन जमिनीवर पडली. आणि तिचा मृत्यू झाला.आठवडाभरापुर्वीच डीजीपीनगर परिसरात एक वर्षाच्या बालकाचा टबमध्ये बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. आणि आता यानंतर पुन्हा चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

अशी घडली घटना....

वासननगर परिसरातील शांती वैभव सोसायटीत हनुवटे नावाचे कुटुंब राहते. त्यांना एक गोड अशी तीन वर्षाची चिमुकली असून तिचे नाव भाग्यश्री हनुवटे... भाग्यश्री तशी सर्वांचीच लाडकी..  भाग्यश्री ही पलंगावर खेळत असताना अचानकपणे तोल जाऊन जमिनीवर गुरूवारी (दि.५) पडली. यामुळे फरशीचा तीच्या डोक्यास गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत भाग्यश्रीला कुटुंबीयांनी उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच या चिमुकलीने प्राण सोडला. भाग्यश्रीच्या अचानकपणे जाण्याने सोसायटीत शांतता पसरली होती. हुशार अन् खेळकर स्वभावाच्या भाग्यश्रीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

कुटुंबियांचा हलगर्जीपणा कारणीभूत?

या घटनांमागे कुटुंबियांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. बालकांच्या अपघाती मृत्यूच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT