Unseasonal Rain Crop Damage esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Unseasonal Rain : पिंपळनेरसह परिसरात अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule Unseasonal Rain : पिंपळनेर, कुडाशी, देशशिरवाडे, जेबापूरसह परिसरात अवकाळी पाऊस, कांदा व भाजीपाल्याचे नुकसान झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त झाली. पिंपळनेर शहरात दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पावसाला (Dhule Unseasonal Rain) सुरवात झाली. (unseasonal rain Big loss to farmers in area Pimpalner dhule news)

तब्बल पावणेदोन तास पाऊस बरसत राहिला, तसेच कुडाशी, देशशिरवाडे, जेबापूरसह परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने कांद्याचे मोठे व भाजीपाल्याचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

गेल्या महिन्यात ६ मार्चला अवकाळी पाऊस बरसला होता. आता पुन्हा महिनाभरात दुसऱ्यांदा जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. सातत्याच्या नुकसानीने मेहनतीवर पाणी फिरले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

परिसरातील काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांद्यावर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा आशा अवलंबून असतात. शासनही हमीभाव देत नाही अन् अवकाळीही जगू देत नसल्याने अस्मानी संकटात बळीराजा सापडला. सरकारकडून कोणतीही मदत होत नसल्याने संतापही व्यक्त होत आहे. लवकरात लवकर सरकारकडून मदत व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT