Unseasonal Rain Crop Damage esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Unseasonal Rain : वडेल शिवारात मेघगर्जनासह गारपीट

सकाळ वृत्तसेवा

Dhule Unseasonal Rain : रविवारी (ता. ९) पाचच्या सुमारास वडेल (ता. धुळे) शेतशिवारात अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह झोडपले.

जोरदार वाऱ्यांसह चिंचोक्यांच्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारांमुळे शिवारात बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. (Unseasonal rain dhule Horticultural crops suffered huge losses news)

गेल्या महिन्यात ७ व ८ मार्चला बरसला होता. पुन्हा महिनाभरात दुसऱ्यांदा जोरकस अवकाळी पावसाने काढणीला आणि काढलेल्या कांद्याचे मोडे नुकसान केले आहे. सातत्याच्या नुकसानीने मेहनतीवर पाणी फिरत आहे. सरकारकडून कोणतीही मदत होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

वडेल, तिसगाव, ढंढाणे, रामनगर व हनुमंतवाडी परिसरात गेल्या ७ व ८ मार्चला मुसळधार अवकाळी पाऊस झाला होता. त्या वेळी काढणीला आलेल्या मका, गहू, हरभरा व ज्वारीचे मोठे नुकसान झाले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आता पुन्हा बरोबर महिनाभरात अवकाळीने हजेरी लावली आहे. चिंचोक्यांच्या आकाराच्या गारा बरसल्याने पुन्हा बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरातील काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले. कांद्यावर शेतकऱ्यांच्या बऱ्याशा आशा अवलंबून असतात.

दरम्यान, नगाव, देवभाणे, धमाणे व कापडणेतही तुरळक सरी कोसळल्या. पाचच्या सुमारास आकाश अचानक भरून आले अन् पाच मिनिटे तुरळक सरी कोसळत होत्या. परीरिसरात ज्वारी व मक्यासह कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT