A tree uprooted due to stormy winds at Malda in taluka. Position indicating air speed.
A tree uprooted due to stormy winds at Malda in taluka. Position indicating air speed. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : हवेचा वेग 65 किलोमीटर प्रतितास; राजस्थान, गुजरातमधील कमी दाबाच्या प्रभावामुळे जिल्ह्याला फटका

सम्राट महाजन

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात रविवारी (ता. ४) सकाळी आलेल्या मॉन्सूनपूर्व वादळी वाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान केले आहे. आणि त्याला निमित्त ठरले आहे वादळादरम्यान असलेला हवेचा प्रचंड वेग.

नंदुरबार जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार वादळाच्या वेळी हवेचा वेग सुमारे ६५ किलोमीटर प्रतितास इतक्या मोठ्या प्रमाणावर गेला होता आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. (Wind speed 65 km per hour district hit by effect of low pressure over Rajasthan Gujarat Nandurbar news)

राजस्थान व गुजरातमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याला विशेषतः तळोदा, शहादा व नवापूर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रविवारी सकाळी दहाला ढगाळ वातावरण तयार होत अचानक वादळी वाऱ्यांना सुरवात झाली.

यादरम्यान पावसाचा जोर कमी होता, मात्र वादळी वाऱ्यांच्या थैमानात ठिकठिकाणी वीजखांब वाकलेत-कोसळले, शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर असंख्य नागरिकांच्या घरांचे अक्षरशः पत्रे उडून गेल्याने त्यांच्या संसार उघड्यावर आल्याच्या घटना घडल्या आहेत आणि त्याला निमित्त ठरले आहे, वादळाच्या दरम्यान असलेला हवेचा प्रचंड वेग.

सकाळी आलेल्या वादळादरम्यान हवेचा वेग जवळपास ३५ नॉट् म्हणजेच जवळपास ६५ किलोमीटर प्रतितास इतका जबरदस्त होता. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

सामान्यतः हवेचा वेग हा १५-२० किलोमीटर प्रतितास इतका असतो. तसेच पावसाळ्याला सुरवात होण्याअगोदर (मॉन्सूनपूर्व पाऊस) किंवा पहिल्या पावसात किंवा पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात अनेकदा वादळी वाऱ्यांसह पाऊस पडतो.

त्या वेळी हवेचा वेग हा जवळपास ३०-३५ किलोमीटर प्रतितास इतका असतो. मात्र आज वादळी वाऱ्यांच्या दरम्यान हवेचा वेग जवळपास ६५ किलोमीटर प्रतितास इतका होता. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सातपुड्यामुळे कमी नुकसान

गुजरातमधील छोटा उदयपूर येथील कृषी हवामान केंद्रात आज हवेचा वेग जवळपास ५४ नॉट् म्हणजेच जवळपास १०० किलोमीटर प्रतितास इतका नोंदविला गेला आणि नंदुरबार येथील हवामान केंद्रात हवेचा वेग जवळपास ३५ नॉट् म्हणजेच जवळपास ६५ किलोमीटर प्रतितास इतका नोंदविला गेला.

मात्र सातपुड्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात हवेचा वेग काही प्रमाणात कमी झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. नाहीतर आज हवेचा वेग ७५ किलोमीटर प्रतितास इतका राहिला असता आणि आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते असे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT