winter
winter esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News | धुळ्यात हुडहुडी परतली; पारा @7.8, दैनंदिन जनजीवनावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्यात ठिकठिकाणी तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. धुळ्यातील किमान तापमानाचा पाराही ७.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान, थंडीच्या लाटेची शक्यता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीच्या लाटेपासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी केले. (winter temperature Mercury below 8 degrees impact on daily life Dhule News)

मागील वर्षी अर्थात डिसेंबर २०२२ मध्ये १० डिसेंबरला धुळ्यातील किमान तापमानाचा पारा थेट ५.५ अंशांवर आला होता. त्यानंतर पुन्हा पारा वर चढायला सुरवात झाली. १५ व १७ डिसेंबरला किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअसपर्यंत वर आले होते. त्यामुळे थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र निर्माण झाले.

दरम्यान, २०२२ या सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाच्या स्वागतालाच तापमानाचा पारा पुन्हा कमी होत असल्याचे दिसते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किमान तापमान ९.६ होते. त्यानंतर दोन दिवसांपासून हा पारा पुन्हा खाली आला असून, २ व ३ डिसेंबर या दोन दिवसांपासून धुळ्यातील किमान तापमानाचा पारा ७.८ अंश सेल्सिअसवर आला आहे.

त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या अंगावर पुन्हा गरम कपडे पाहायला मिळत आहेत. विशेषतः सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीचा हा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

संभाव्य लाटेला असे सामोरे जा

थंडीच्या संभाव्य लाटेपासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपाययोजना सुचविल्या आहेत. यात अतिशय आवश्यकता असल्यास घराबाहेर जावे अन्यथा घरीच थांबावे, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे वापरावेत.

एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध शेजारच्या व्यक्तीकडे लक्ष द्यावे, गरम राहणाऱ्या किंवा जास्त हवा न येणाऱ्या खोलीमध्ये वास्तव्य करावे, शक्य झाल्यास रूम हीटरचा वापर करावा. गरम पेय घ्यावे. शरीर उष्ण राहण्यासाठी व थंडीच्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करावे.

ताजे पदार्थ खावेत, मादक पदार्थ किंवा अल्कोहोलमिश्रित नसलेले पेय घ्यावे. स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास किंवा हाताची बोटे, कानाची पाळी, नाकाचा शेंडा यांचा रंग पांढरा किंवा फिक्कट झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तसेच शरीर थंड पडणे, थंडी वाजणे, स्मृतिभ्रंश होणे, बोलताना विसंगती किंवा अडखळणे, उच्चार स्पष्ट न करता येणे, अंधारी येणे, थकवा जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी केले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मागील आठ दिवसांतील पारा

तारीख...कमाल...किमान (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

- २७ डिसेंबर............३०.०...११.०

- २८ डिसेंबर...........३०.०...१०.०

- २९ डिसेंबर.............२९.०...९.८

- ३० डिसेंबर...........३१.०...११.५

- ३१ डिसेंबर २०२२...३१.०...१०.२

- १ जानेवारी २०२३.....२९.०...९.६

- २ जानेवारी.............२८.०...७.८

- ३ जानेवारी.............२८.०...७.८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT