Dhule: Shiv Sena (Ubatha) party office bearers and activists protesting against the increase in house rent in Redya procession. esakal
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Agitation : वाढीव घरपट्टीच्या नोटिसा त्वरित मागे घ्या; शिवसेनेचे लक्षवेधी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये धुळे महापालिका सर्वांत जास्त कर आकारणी करणारी महापालिका आहे.

दोन वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीला ठेका देऊन मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्यानंतर आता मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत.

या नोटिसा त्वरित मागे घ्या, अशी मागणी करत शिवसेना (उबाठा) पक्षाने लक्षवेधी आंदोलन केले. रेड्याच्या अंगावर ‘मनपाची वाढीव हुकूमशाही घरपट्टी’ असे लिहून मिरवणूक काढत व जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. (Withdraw notice of increased rent immediately Shiv Sena attention grabbing movement Dhule News)

वास्तविक मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर स्थायी समिती, महासभेत ठराव करणे क्रमप्राप्त होते. मात्र, तसे न करता मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वसुली विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पहिल्या टप्प्यात सुमारे २४ हजार ५०० पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्ताधारकांपैकी ११ हजार ५०० मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.

टप्प्याटप्प्याने शहरातील इतर मालमत्ताधारकांनाही अशाच नोटिसा बजावण्यात येणार आहेत. हा सर्व प्रकार सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये धुळे महापालिकेद्वारे आकारलेला कर सर्वांत जास्त आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सभागृहाच्या २२ डिसेंबर २०२२ चा महासभेत ठराव क्रमांक-१९२ घसारा मूल्याचा ठराव फेरफार करून, सभागृहाला अंधारात ठेवून, टिप्पणीत शब्दच्छल करून परस्पर मंजूर दाखविण्यात आला. ही मनमानी वाढ करण्यात आली.

जीझिया कर आकारणी

यात शिक्षण कराची आकारणी दोनदा केली. एकत्रित मालमत्ता करात ३० टक्के, विशेष शिक्षण कर, वृक्षसंवर्धन, अग्निशमन प्रत्येकी एक टक्का, जललाभ, दिवाबत्ती, मलनिस्सारण, पथकर ०.५ टक्के, विशेष स्वच्छता ५० रुपये, मलपप्रवाह सुविधा ४०० रुपये, मोठी इमारत १० टक्के असा अव्वाच्या सव्वा कर आकारण्यात आला आहे. एक प्रकारे मनपा जिझिया कर आकारत असल्याची टीका शिवसेना (उबाठा)ने केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भूमिका स्पष्ट करा

या करवाढप्रश्‍नी महापालिका आयुक्त, रिमोटद्वारे महापालिकेचा कारभार चालविणारे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी जनतेसमोर येऊन आपली भूमिका मांडवी, अशी मागणीही शिवसेना (उबाठा) पक्षाने केली.

दरम्यान, करवाढीच्या नोटिसा मिळाल्याबरोबर हरकती नोंदवा, असे आवाहनही पक्षाने केले. पक्षाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, संपर्कप्रमुख प्रा. शरद पाटील, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, जयश्री महाजन, कैलास पाटील, नरेंद्र परदेशी, प्रफुल्ल पाटील, देवीदास लोणारी, अरुणा मोरे, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, संजय जवराज, विनोद जगताप, कैलास मराठे, प्रवीण साळवे, आबा भडागे, भटू गवळी, आनंद जावडेकर, रफीक पठाण यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT