Accident News
Accident News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मोटारसायकलवर कंटेनर उलटल्याने तरुण ठार; मालेगावजवळ अपघात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : भरधाव कंटेनर मोटारसायकलवर उलटून परसामळ (ता. शिंदखेडा) येथील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ३) मुंबई-आग्रा महामार्गावर टेहेरे (ता. मालेगाव) येथील हुतात्मा चौक हॉटेल राजधानीसमोर घडली.

परसामळ येथील योगेश विजय कोळी (वय २४) नाशिकहून गावी मोटारसायकलने येत असताना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास टेहेरे गावाजवळ भरधाव आलेला कंटेनर (एमएच ४६, एआर ०५९५) मोटारसायकलवर उलटून योगेश कोळी गंभीर जखमी झाल्याने त्याला त्वरित मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Youth killed as container overturns on motorcycle Accident near Malegaon Dhule News)

मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताबाबत छावणी (मालेगाव) पोलिस ठाण्यात कंटेनरचालक शरद परदेशी (३६, रा. बांबरूड बहाळ, ता. भडगाव, जि. जळगाव) याच्याविरोधात अपघातास कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

योगेश कोळी नुकताच बी. फार्मसी उत्तीर्ण झाला होता. तो तीन महिन्यांपूर्वीच नाशिक येथे एका फार्मास्युटिकल कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कामाला लागला होता. तो एकटाच असल्याने परसामळ गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT