Akhilesh Yadav  Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

अखिलेश यादव यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार नसणार; करहलमधून पक्षाची माघार

सकाळ डिजिटल टीम

Uttar Pradesh assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. यादरम्यान काँग्रेसने मंगळवारी मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यापासून थांबवले आहे. येथे समाजवादी पक्षाचे (SP) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) निवडणूक लढवत आहेत. दरम्यान काँग्रेस (Congress) ने अखिलेश यादव यांच्यासमोर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

अखिलेश यादव हे करहलमधून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्याने आम्ही आज उमेदवारी दाखल केली नाही. ही जागा होल्डवर होती असे AICC-मैनपुरीचे समन्वयक मनीष शाह यांनी सांगितले.

काँग्रेसच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये समाजवादी पक्ष गांधी कुटुंबाविरुद्ध आपले उमेदवार उभे करत नाही. याआधीही काँग्रेसने मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला नव्हता. पण पहिल्या यादीत काँग्रेसने करहालमधून उमेदवार जाहीर केला होता आणि तोपर्यंत अखिलेश यादव यांना करहाळमधून उमेदवारी जाहीर केली नव्हती. मात्र आता काँग्रेसने या जागेवरून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच काँग्रेसने जसवंत नगरमधून अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसने अखिलेश यादव यांच्यासमोर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असला तरी बसपाने आपला उमेदवार उभे केले आहेत. अखिलेश यादव यांच्यासमोर बसपने कुलदीप नारायण यांना करहाल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी जसवंतनगर जागेवर बसपने शिवपाल यादव यांच्यासमोर ब्रजेंद्र प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी भाजपने अखिलेश यादव यांच्यासमोर एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्याम तिसर्‍या टप्प्यातील करहाल मतदारसंघात २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT