100 crore fund to yavatmal from the 15 finance Commission 
विदर्भ

जुना शिल्लक असतानाच धडकला नवा निधी, आता खरंच कामे होतील का?

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्याला 105 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामपंचायतील 50 टक्‍के बंधित निधी हागणदारीमुक्त गाव व पाणीपुरवठ्यावर खर्च करता येणार आहे. उर्वरित 50 टक्‍के निधीमधून उर्वरित कामांवर खर्च करता येणार आहेत.

15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला 80 टक्‍के,  जिल्हा परिषद, पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्‍के निधी देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अटी व शर्थीनुसार हा निधी खर्च करता येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बंधित व मुक्त असे दोन प्रकार 15व्या वित्त आयोगात आहे. बंधितमधून स्वच्छता, हागणदारीमुक्त, स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल, दुरुस्ती, पेयजल पाणीपुरवठा, जलपुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हावेस्स्टग), जल पुनगप्रक्रिया वॉटरवर सायकलिंग आदी कामांवर खर्च करता येणार आहेत. त्याअनुषंगाने ग्रामपंचायतीला नियोजन पाठवावयाचे होते. मध्यंतरी कोरोनामुळे नियोजन करता आले नाही. नंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. आता नियोजन प्राप्त झाले आहे.

जिल्ह्याला जून महिन्यात 15व्या वित्त आयोगाचा पहिला 52 कोटी 85 लाख 71 हजार,  दुसरा 52 कोटी 85 लाख 71 हजार हफ्ता प्राप्त झाला आहे. आतापर्यंत 105 कोटी 51 लाख 42 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेल्या निधीनुसार हागणदारीमुक्त गावातील कामे व पाणीपुरवठ्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. उर्वरित दहा टक्‍के निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेल्या निधीमधून प्रत्येक सदस्यांच्या सर्कलमधील कामे प्रस्तावित केले जाणार आहेत. मुक्त निधीतून गावातील रस्ते, पांदण रस्ते, अंगणवाड्या इमारतींचे बांधकाम, अंगणवाडी डिजिटल करणे यांसह इतरही कामे करता येणार आहेत. गावातील निकड लक्षात घेता ही कामे ग्रामसेवक, सरपंच यांच्या मर्जीतून होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्याला प्राप्त झालेल्या दोन हप्त्यातील दमडीही आतापर्यंत खर्च झालेली नाही. लवकरच तिसरा हप्ता मार्च महिन्यात येण्याची शक्‍यता आहे. अशापरिस्थितीत हा निधी खर्च करताना प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

चार कोटी निधी शिल्लक -
जिल्ह्याला 14व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीमधील चार कोटी रुपये शिल्लक आहे. हा निधी खर्च करण्याच्यादृष्टीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. त्यानुसार शासनाने 31 मार्च 2021पर्यंत खर्च करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यात आता कुठल्या स्वरूपाची कामे प्रस्तावित केले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT