Accused sentenced to 10 years in Yavatmal for torturing a minor girl on a two wheeler 
विदर्भ

अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षे शिक्षा; दहा हजारांचा दंड

सूरज पाटील

यवतमाळ : शिकवणीवर्गातून ऑटो पॉइंटवर आलेल्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मंगळवारी (ता. आठ) हा निकाल अतिरिक्त सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला.

गुणवंता गेडाम (रा. डोंगरखर्डा, ता. कळंब) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोन जून 2017 रोजी अल्पवयीन मुलगी शिकवणी वर्ग आटोपून ऑटो पॉइंटवर आली. त्यावेळी आरोपीने मुलीचा हात पकडून बसस्थानकाकडे बोलावले. जबरदस्तीने दुचाकीवर बसायला सांगितले. आरोपीचा मामेभाऊ नीलेश मुलीच्या सांगण्याप्रमाणे सोबत गेला. रावेरी गावाजवळ पोहोचताच नीलेशला दुचाकी थांबवायला सांगून गुणवंता मुलीला घेऊन पुलाखाली गेला. पीडितेसाबत अश्‍लील चाळे करायला सुरुवात करताच नीलेशने विरोध केला. 

मात्र, गुणवंताने जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. मोबाईलमध्ये अश्‍लील फोटो काढून ही बाब कुणाला सांगितल्यास फोटो लोकांना दाखविण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने राळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक ए. एन. सोळंके यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित, आरोपीचा मामेभाऊ नीलेश, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

कलम 4 बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 प्रमाणे दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम 376 भादंविअंतर्गत शिक्षा कलम बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2011मध्ये समाविष्ट करण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.

मामेभावावर केली दगडफेक

गुणवंता मुलीसोबत वाईट कृत्य करीत असल्याचे बघून मामेभाऊ नीलेश याने विरोध केला. मात्र, गुणवंता काही ऐकण्याचा मानसिकतेत नव्हता. मामेभावाला पळवून लावण्यासाठी त्याने पुलाखाऊन दगडफेक केली. त्यामुळे नीलेश गेल्यावर गुणवंताने मुलीवर अत्याचार करून फोटो काढले. या खटल्यात नीलेशची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT