file photo 
विदर्भ

कोरोनाचे कारण देऊन कलावंतांचा आवाज प्रशासनाने दाबला; आठ महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : शासनाने पॅकेज जाहीर करावे, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कलावंतांनी बुधवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर गोंदिया जिल्हा कलाकार संघाच्या वतीने शांती मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, प्रशासनाने त्यांचा मोर्चा हाणून पाडला. प्रशासनाने या कलावंतांचा आवाज दाबल्याची आरोप आता होत आहे.  

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, जनजागृती करण्याचे काम कलावंत करीत आहेत. लोककलेच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करीत आहेत. फक्त कलेला आपले सर्वस्व मानणाऱ्या कलावंतांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न यातून मिटतो. वर्षातील आठ महिने घराबाहेर राहून समाजप्रबोधन करणारे कलावंत गत आठ महिन्यांपासून उपेक्षिततेचे जीवन जगत आहेत.

कलावंतांना बेरोजगारीचे चटके

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मार्चपासून लॉकडाउन घोषित केला. तेव्हापासून या कलावंतांना बेरोजगारीचे चटके सहन करावे लागत आहेत. अनलॉक मोहीम सुरू झाली असताना आणि हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होत असताना शासनाने मात्र, कलावंतांना कला सादरीकरणाला बंदीच घातली आहे. त्यामुळे कुटुंबांसह कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नदेखील कठीण बनला आहे.

आर्थिक पॅकेज जाहीर करावे

दरम्यान, कलावंतांना पॅकेज जाहीर करावे, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी जिल्हा कलाकार संघाच्या बॅनरखाली कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतीपूर्ण मोर्चाचे आयोजन केले. मात्र, सर्कस ग्राउंडवरून निघणाऱ्या या मोर्चाची वाट सर्कस ग्राउंडवरच रोखण्यात आली. त्यामुळे प्रशासनानेही त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा केल्याचे दिसते.

डीजेचा आवाजही बंद

लग्न समारंभ असो वा अन्य कोणतेही कार्यक्रम यात सहसा डीजेचा आवाज घुमतो. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून डीजेचा आवाजदेखील बंद आहे. डीजेच्या माध्यमातून रोजीरोटीचा प्रश्‍न मिटविणाऱ्यांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road Clash : मीरारोडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २० रिक्षांची केली तोडफोड, मुलीच्या छेडछाडीवरून झाला वाद

AUS vs IND: 'विराट कोहली-रोहित शर्मा यांनी कधीही निवृत्ती घेतली, तरी त्यांची...', रवी शस्त्रींनी स्पष्ट बोलून दाखवलं

तुला लाज कशी वाटली नाही... ती जाहिरात केली आणि शम्मी कपूर यांच्यावर भडकले राज कपूर; वाचा तो किस्सा

Mhada House: पालिकेने थकवला म्‍हाडाचा महसूल! सहा वर्षांपासून २२५ घरांचा मोबदला नाही

BAN vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिज संघाने घडवला इतिहास, वन डे क्रिकेटमध्ये असा वर्ल्ड रेकॉर्ड कोणीच केला नव्हता...

SCROLL FOR NEXT