Dhan Parhe 
विदर्भ

तहानलेल्या शेतांना दिला आषाढसरींनी दिलासा... 

मिलिंद उमरे

गडचिरोली : यंदा पावसाचा जोर तसा कमीच असला, तरी काही दिवसांची गैरहजेरी लावून आषाढसरी शुक्रवारी (ता. 10) पहाटेपासून हजर झाल्याने तहानलेल्या शेतांना दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी धानपऱ्ह्यांचे कोमेजणे सुरू झाले होते. पण या पावसाने त्यांना काही प्रमाणात संजीवनी मिळाल्याचे दिसून येत आहे. 

यंदा मृगाच्या पावसाने फारशी कामगिरी केली नाही. पहिल्याच चेंडूत त्रिफळा उडालेल्या फलंदाजाप्रमाणे हे नक्षत्र शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणून आकाशाच्या पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर आर्द्रा व नुकत्याच गेलेल्या पुनर्वसू नक्षत्रानेही फारशी कामगिरी केली नाही. आषाढ मास प्रारंभ झाल्यानंतरही पावसाला जोर नसल्याने शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे कोमजण्याच्या व करपण्याच्या स्थितीत आले होते. खरेतर आर्द्रा नक्षत्रात भरपूर पाऊस असतो. पण, यंदा पावसाने जरा अढीच दिली आहे.

आषाढसरी जोमाने बरसाव्यात अशी विनवणी शेतकरी आकाशाकडे बघून करीत होते. अखेर शुक्रवारी या आषाढसरी बरसल्या. मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. कधी लख्ख ऊन पडून उष्णताही वाढत होती. या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन पऱ्ह्यांना तजेला मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. गडचिरोली हा धानशेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात खरीप हंगामाला अतिशय महत्त्व आहे. शिवाय जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. असाच पाऊस अनेकदा धोका देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. 

चिंतेचे ढग दाटले... 

आकाशात काळेभोर ढग दिसत असले, तरी ते फारसे कोसळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग दाटून आले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यंदा तेंदू हंगामही फारसा होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोसळले आहे. त्यात पाऊस लहरीपणा करत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. 

संपादन - राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT