Cable 
विदर्भ

मनपा, मोबाईल कंपन्यांच्या वादात भरडला जातोय ग्राहक

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महापालिका आणि मोबाईल कंपन्यांच्या वादात अकोला शहरातील मोबाईल ग्राहक भरडला जातोय. कंपनी व मनपाच्या वादात नेटवर्कच जाम झाले आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठ परिसरासह शासकीय कार्यालय परिसर आणि गौरक्षण रोडवरील नेटवर्क जाम झाले आहे. दोन दिवसांपासून ही स्थिती कायम आहे. एकीकडे मनपा कारवाईत गुंतली असताना मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही.

विविध कंपनीचे केबल कापले
महापालिकेच्‍या विद्युत विभागाव्‍दारे शहरातील जठारपेठ परिसरातील गुप्‍ते मार्ग, स्‍वरूची गार्डन जवळील भाग, निबंधे प्‍लॉट, विदर्भ कोकण बँक गल्‍ली, मोठी उमरी येथील वेद मंगल कार्यालय गल्‍ली, विवार ले-आउट, शिवर तसेच पी.के.व्‍हि. येथील संताजीनगर पर्यंतच्‍या रस्‍त्‍यावरील बिना परवानगीने मनपा पथदिव्यांच्या खांबावर लावण्‍यात आलेले विविध कंपनीचे नेटचे तसेच स्‍थानिक केबल नेटवर्कचे केबल कापून जप्‍त करण्‍यात आले. त्यामुळे या परिसरातील नेटवर्कही बुधवारी जाम झाले होते.

कंपन्यांनी सोडले ग्राहकांना वाऱ्यावर!
मोबाईल कंपन्यांना ग्राहकांच्या बळावर कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत. मनपाच्या नियमांची पालमल्ली केल्याचे उघड झाल्यानंतर कारवाईचा धडका सुरू होताच मोबाईल कंपन्यांनी त्याच मोबाईल ग्राहकांना वाऱ्यावर सोडले आहे. दोन आठवड्यांपासून शहरातील मोबाईल नेटवर्क जाम असताना मोबाईल कंपन्या त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे मोबाईल कार्डच बदलविण्यास ग्राहकांनी पसंती दिली आहे.

मनपाच्या कारवाईला ठेंगा
महापालिकेने विद्युत खांबांवरील केबल कापले. त्यामुळे मोबाईल नेटवर्क जाम झाले आहे. एकीकडे केबल कापले जात असताना मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी दुसरीकडे या कारवाईल ठेंगा दाखवत पुन्हा केबल जोडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे दुपारपर्यंत बंद राहणारे नेटवर्क सायंकाळपासून पुन्हा सुरळीत होऊ लागते. मनपाचे कर्मचारीच मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून कापलेले केबल जोडण्याची परवानगी देत असल्याची माहिती आहे.

35.40 किलोमीटर अवैध केबल
शहरात भूमिगत केबल टाकणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेले नकाशे सादर केले. त्यावरून मनपाने केलेल्या पाहणीनुसार आतापर्यंत 35.40 किलोमीटरचे केबल विना परवानगी टाकण्यात आले असल्याचे आढळून आल्याचा दावा मनपातर्फे करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

Nashik Kumbh Mela : महापालिकेचा टीडीआर प्लॅन; कुंभमेळ्यासाठी भूखंड ताब्यात घेण्याची तयारी

Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी! मेट्रो संख्येत होणार वाढ, किती मिनिटाला धावणार ट्रेन?

SCROLL FOR NEXT