मनपा उपायुक्तांसह स्वीयसहायक एसीबीच्या जाळ्यात
मनपा उपायुक्तांसह स्वीयसहायक एसीबीच्या जाळ्यात 
विदर्भ

मनपा उपायुक्तांसह स्वीयसहायक एसीबीच्या जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

हॉटेल व्यावसायिकास मागितले २५ हजार; बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी घेतली लाच

अकोला : बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपा उपायुक्तांच्या स्वीयसहायकासह अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  हॉटेलमधून अटक केली. त्यानंतर एसीबीने मनपा उपायुक्तास त्याच्या निवासस्थानावरून अटक केली. विशेष म्हणजे, आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीला चार दिवसही पूर्ण होत नाही तोच मनपातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.

३० वर्षीय फिर्यादी यांचे हॉटेल आहे. त्यांनी बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी मनपाकडे अर्ज केला. या अर्जाच्या परवानगीसाठी मनपा उपायुक्त (प्रशासन व विकास) समाधान चांगो सोळंके यांच्याकडे आला. अर्जदाराला बुधवारी (ता. 15) दुपारी समाधान सोळंके यांनी त्याच्या कक्षात बोलावून स्वीयसहायक राजेश रामदास जाधव (४३) यांच्यातर्फे २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे फिर्यादींनी ठरविले. स्वीयसहायक राजेश जाधव व त्याचे दोन साथीदार हे रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता व पैसे घेण्याकरिता गेले. फिर्यादीने त्यांना २० हजार रुपये दिल्याबरोबर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राजेश जाधव यास पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचे सांगितल्यानंतर एसीबीने सोळंके यांना रामनगरमधील म्हाडा कॉलनीतील बंगला नं. दहा मधून अटक केली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एसीबीकडून या दोघांनाही आज (गुरुवार) न्यायालयात हजर करण्यात येईल.

स्वीयसहायकाने मागितले अतिरिक्त दोन हजार
हॉटेल व्यावसायिकाकडून २० हजार रुपये स्वीयसायक राजेश जाधव याने स्वीकारल्यानंतर ही रक्कम साहेबांची असल्याचे सांगितले. माझे वेगळे दोन हजार रुपये लागतील, असेही जाधव फिर्यादींना म्हणाला.

हॉटेलमध्ये गेले जेवण
हॉटेल व्यावसायिकाकडे २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी मनपा उपायुक्ताचे स्वीयसहायक राजेश जाधव हा दोघांना सोबत घेऊन गेला. तिथे त्यांच्यासोबत जेवण केल्यानंतर व्यावसायिकाकडे लाचेची मागणी केली. पैसे स्वीकारल्यानंतर एसीबीने त्यास अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT