Animal in the train 
विदर्भ

काय हे नशीब! घोडे, श्‍वान, बकरेही करतात रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास

योगेश बरवड

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांसोबतच प्राण्यांच्या वाहतुकीतही आघाडी घेतली आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या वर्षभराच्या काळात नागपूर रेल्वेस्थानकाहून 6 घोड्यांना दिल्लीला पाठविण्यात आहे. यासोबतच 356 श्‍वान, 374 बकरे आणि 2 पक्ष्यांनीही रेल्वे प्रवासाचा आनंद घेतला. याशिवाय रेल्वेतून रुग्णांवर उपचारासाठी 28.6 क्विंटल रक्तघटकही पाठविण्यात आले. 

कमी खर्चात सुरक्षित प्रवासाची खात्री असल्याने रेल्वेलाच पसंती दिली जाते. प्रवासी, उत्पादने, प्राण्यांचा प्रवास अशा आगळ्यावेगळ्या सेवेमुळे रेल्वेवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवासादरम्यान पशू, पक्षी आणि प्राण्यांमुळे इतर प्रवाशांना त्रास होणार नाही यासाठी प्राण्यांसोबत मालकाने प्रवास करावा, असा नियम आहे. वातानुकूलित प्रथम बोगीच्या कुप्यामधून हा प्रवास करता येतो. हा खर्च करणे शक्‍य नसल्यास प्राण्यांसाठी गार्डच्या डब्याजवळील डब्यात (डॉग बॉक्‍स) प्राण्यांची व्यवस्था असते. वजनाप्रमाणे प्राण्यांचे तिकीट लागते; परंतु हे प्रवाशांच्या तिकिटांपेक्षा कमीच असते. प्राण्यांना कोणताही आजार नसल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. प्राणी, पार्सल वाहतुकीसाठी रेल्वेने केवळ 3 रुपये प्रतिकिलो असा दर ठेवला आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात नागपूर रेल्वेस्थानकावरील पार्सल विभागाकडून रुग्णांवर उपचारासाठी लागणारे 28.6 क्विंटल रक्तघटक मुंबईला पाठविण्यात आले. सोबतच 28 थर्माकोलच्या विशिष्ट डब्यातून 4.8 क्विंटल रक्तनमुनेही मुंबईला तपासणीसाठी पाठविण्यात आले. पार्सल विभागाकडून वीज उत्पादनासाठी लागणारे साहित्य, कोळसा, धान्य, फळे, भाजी, मासे, मिठाई यासोबतच प्राणी, मोटारसायकल इत्यादी साहित्य पाठविले जाते. मुख्य पार्सल पर्यवेक्षक शेखर बालेकर यांच्या देखरेखीत मुंबई, हावडा, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली इत्यादी मार्गांवर साहित्य सुरक्षित पाठविण्यात आले. पार्सल विभागाचे एरवीचे रोजचे सरासरी उत्पन्न पावणेदोन लाखांचे आहे. टाळेबंदीच्या काळात मात्र पार्सल विभागाने 3 कोटींचे उत्पन्न मिळविले. 

पार्सल कार्यालयावर 24 तास वॉच 

नागपूरच्या पार्सल कार्यालयातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. यासाठीच्या प्रस्तावाला परवानगीही मिळाली आहे. बुकिंग केलेल्या पार्सलसंदर्भात शंका आल्यास पार्सल अधिकारी त्याची तपासणी करू शकतात, तसे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT