birds died in kelapur of yavatmal 
विदर्भ

'बर्ड फ्लू'चे सावट; मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत, पशूसंवर्धन यंत्रणा अलर्ट

सूरज पाटील

यवतमाळ : जिल्ह्यात अद्याप 'बर्ड फ्लू'चे निदान व्हायचे असले तरी मृत झालेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आले आहेत. केळापूर तालुक्‍यात लिंगटी शिवारात मृत आढळलेल्या पक्ष्यांचा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये यासाठी यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिले आहेत.

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

देशात व राज्यात आढळलेल्या 'बर्ड फ्लू' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.13) आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सहायक आयुक्त डॉ. क्रांती काटोले, उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, डॉ. नागापुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आर. डब्ल्यू. खेरडे आदी उपस्थित होते. निरोगी पक्षाचे चिकन खाण्यास कोणतेही निर्बंध नाही. मात्र, घरी आणलेले चिकन संपूर्णपणे उकळून (बॉईल) घ्यावे. मृत आढळलेल्या पक्षाच्या केंद्रातून इतर कोणताही पक्षी बाहेर जाता कामा नये. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या संपर्कात राहून पक्षांची आवागमन करण्यास निर्बंध घालावे. पांढरकवडा परिसरात हा प्रकार आढळून आल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणेला अलर्ट करून योग्य काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यवतमाळात दोन कावळ्यांचा मृत्यू -
केळापूर तालुक्‍यात लिंगटी परिसरातील कुक्कुटपालन केंद्रात 286 पक्षांचा संशयित मृत्यू झाला. आर्णी तालुक्यात आठ मोर, दारव्हा तालुक्‍यात चार वराह, घाटंजी परिसरात चार कावळे व यवतमाळातील दोन कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उपायुक्त डॉ. डॉ. बी. आर. रामटेके यांनी दिली.

लिंगटी अलर्ट झोन घोषित -
केळापूर तालुक्‍यातील लिंगटी शिवारात कुक्कुटपालन केंद्रातील पक्ष्यांचा मृत्यू झाल्यामुळे अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लिंगटी गाव शिवारातील कुक्कुट पक्षीगृहापासून दहा किलोमीटरमधील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजाराला प्रतिबंध करण्यात आला आहे. लिंगटी हे गाव अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT