Boxer Harivansh Ravindra Tavari looks forward to the new year 
विदर्भ

Video : टार्गेट २०२१ : नये सालमें कुछ अच्छा होगा! बॉक्सर हरीवंश रवींद्र टावरीला अपेक्षा

मनोज भिवगडे

अकोला : प्रथमच देशाबाहेर खेळलो, तेथून परत आल्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेची तयारी सुरू केली आणि कोरोनामुळे सर्वत्र लॉकाडाउन झाले. या लॉकडाउनने अनेकांचे भाग्यही ‘लॉक’ झाले. त्यात क्रीडापटूही मागे राहिले नाहीत. संपूर्ण वर्ष निराशेत गेले. आता यातून सावरीत नवीन वर्षात काही तरी चांगले होईल, अशी अपेक्षा अकोल्यातील आंतरराष्ट्रीय बॉक्सर हरीवंश रवींद्र टावरी याने व्यक्त केली.

संपूर्ण जग थांबेल... याची कल्पना कुणीच केली नव्हती. कोरोना संकट हे एखाद्या इंग्रजी चित्रपटाच्या कथानकासारखे होते. या अनपेक्षित संकटातून आता हळूहळू सर्वच सावरू लागले आहेत. त्याला क्रीडा क्षेत्रही अपवाद ठरले नाही. कोरोनामुळे वर्षभर सरावात बाधा आली. त्यातून मार्ग काढले. या काळात खूप काही शिकायला मिळाले, अनेकांचे सहकार्य लाभले.

प्रशिक्षण सतिषचंद्र भट्ट यांनी धैर्याने संकटाचा सामना करण्यासाठी आत्मबळ दिले. मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर घराबाहेर पडणे कठीण झाले होते. त्यामुळे सराव बंद पडला होता. सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यात नैराश्य आलं होतं. चार भिंतीच्या आड काही दिवस वर्कआऊट केल्यानंतर परिसरात जेथे गर्दी नाही अशा मैदानांवर, मोकळ्या जागेत जाऊन सराव सुरू केला. 

प्रशिक्षण केंद्रातील पंच किट भट्ट सरांना मागून घेतली व घरीच वर्कआऊट सुरू केले. सात-आठ महिने हा प्रयोग सुरू होता. आता प्रशिक्षण केंद्रात जाऊन सराव करण्याची संधी मिळत आहे. सर्व काही सुरळीत होताना दिसत आहे. अकोला क्रीडा प्रबोधिनीतील बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रावर सर्व नियम पाळून आम्ही सर्व बॉक्सर सराव करतो आहे.

कोरोना संकटाने वाया गेलेला काळ येणाऱ्या काळात भरून काढण्याचा प्रयत्न आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धा व ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांचे आयोजनाची प्रतीक्षा आहे. त्याचीच तयारी जोमाने सुरू असल्याचे हरीवंशने सांगितले.

अकोला येथील क्रीडा प्रबोधिनीचे मार्गदर्शक सतिशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात सराव करणाऱ्या हरीशवंशचे पुढील वर्षीचे लक्ष्य राष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत ६० किलो वजन गटात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असून, पुन्हा एक राष्ट्रीय सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रयत्न आहे.

कोरोनाचे संकट कायम आहे हे गृहीत धरूनच स्पर्धांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीतच राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करायची आहे. त्यामुळे बहुधा कारकिर्दीतील हे सर्वोत्तम यश असेल.

हरीवंशने २००९ मध्ये बॉक्सिंग खेळण्यास सुरुवात केली. त्याने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत १५ पदके मिळविली आहेत. राज्य पातळीवरील स्पर्धेत त्याला २२ पदके मिळाली आहेत. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत व खेलो इंडिया स्पर्धेत त्याला बॉक्सिंगचे सुवर्णपदक मिळाले आहे. याच कामगिरीच्या आधारावर त्याला गतवर्षी इंडोनेशियामध्ये झालेल्या प्रेसिडेन्ट इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.

प्रत्यक्ष रिंगणातील सामन्यांचा सराव मिळू शकेल
गेले वर्षभर खेळाडूंना स्पर्धांपासून दूर राहावे लागले. त्याचा परिणाम भविष्यातील तयारीवर होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक स्पर्धा आयोजित केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी प्रत्यक्ष रिंगणातील सामन्यांचा सराव मिळू शकेल.
- हरीवंश टावरी,
बॉक्सर, अकोला

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT