mangalsutra Esakal
विदर्भ

Buffalo News: ...अन् म्हशीनं गिळलं सव्वा लाखांचं मंगळसूत्र! पशूवैद्यक अधिकाऱ्यांनी केलं महत्वाचं आवाहन

A buffalo swallowed a Mangal sutra: हा प्रकार नेमका काय आहे? जाणून घ्या...

Amit Ujagare (अमित उजागरे)

वाशिम : जनावरांनी काय खावं काय खाऊ नये? याची उपजत समज असते. पण तरीही बऱ्याचदा चाऱ्यासोबत चुकून एखादी वेगळी वस्तू त्यांच्या पोटात गेल्याची अनेक उदाहरणं आपणं पाहिली असतील. अशाच प्रकारे एका म्हशीनं चक्क एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम जिल्यातील सारसी गावात हा प्रकार घडला. (Buffalo swallowed Mangal sutra worth Rs one lakh veterinary officials made an important appeal)

सुत्रांच्या माहितीनुसार, सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीबाबत हा प्रकार घडला आहे. म्हशीला चारा टाकत असताना त्यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचं अडीच तोळ्याचं मंगळसूत्र पडलं. त्याचवेळी चाऱ्यासोबत ते म्हशीच्या पोटात गेलं पण ही बाब तात्काळ संबंधित शेतकरी महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर या कुटुंबानं थेट पशूवैद्यक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

मंगळसूत्र कसं बाहेर काढलं?

पशूवैद्यक अधिकारी बाळासाहेब कौंदाने यांनी सांगितलं की, "मला सारसी गावातून फोन आला होता, एका म्हशीनं चुकून सोन्याचं मंगळसूत्र गिळलं. यानंतर ते लोक ही म्हैस आमच्या दवाखान्यात घेऊन आले. यानंतर मेटल डिटेक्टरनं आम्ही या म्हशीचं चेकअप केलं. यानंतर हे निश्चित झालं की तिनं मंगळसूत्र खाल्लं आहे. (Marathi Tajya Batmya)

महत्वाचं आवाहन

त्यानंतर मंगळसूत्र तिच्या पोटातून बाहेर काढण्यासाठी म्हशीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शस्त्रक्रियेनंतर २५ ग्रॅमची सोन्याचं मंगळसूत्र आम्ही बाहेर काढलं. या शस्त्रक्रियेसाठी आम्हाला दोन तास लागले. यामध्ये म्हशीच्या पोटावर ६० ते ६५ टाके घालण्यात आले. पण आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी जनावरांना चारा देताना जपून द्यावा, ज्यामुळं त्यांना अशा प्रकारचा त्रास होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT