candidate visit school for amravati teacher constituency election campaign 
विदर्भ

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू, शाळा सुरू होताच वाढला प्रचाराचा जोर

सुधीर भारती

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे आता काऊंटडाऊन सुरू झाले असून आज(सोमवार)पासून शाळा सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना भेटी देण्याचे नियोजन या निवडणुकीतील उमेदवारांकडून करण्यात येत आहे. शाळेत एकाचवेळी अनेक शिक्षकांना भेट देणे सोयीचे असल्याने शाळा सुरू होणे ही बाब उमेदवारांच्या पत्थ्यावर पडणार आहे.   

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. 1 डिसेंबरला मतदान होणार असल्याने त्यापूर्वी प्रमुख उमेदवारांनी शिक्षक असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध क्‍लृप्त्या वापरल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा धुराळा उडत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताहेत.

विशेष म्हणजे पाच जिल्ह्यांचा विस्तार असलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना शिक्षक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यात चांगलाच घाम फुटलेला आहे. त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधताना त्यांची पार दमछाक होत आहे. अशातच आता शासनाने 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. तेथेच भेटण्याचे नियोजन उमेदवारांनी आखले आहे. त्यामुळे आता शाळेत येणाऱ्या उमेदवारांना शिक्षकांना भेटावे लागणार आहे.  एकूणच शाळा सुरू करण्याचा निर्णय उमेदवारांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : पंजाबमधील लुधियाना येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT