cheque distribution to kochhi project affected farmers in saoner of nagpur
cheque distribution to kochhi project affected farmers in saoner of nagpur  
विदर्भ

अखेर कोच्छी प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, वाद निकाली निघताच धनादेश वाटपाला सुरुवात

मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर ) : कोच्छी प्रकल्पाअंतर्गत बुडीत क्षेत्रात येणाऱ्या कोची गावठाणाचे पुनर्वसन कोच्छी ५२ गाव येथे करण्यात येत आहे. त्यानुसार गावकऱ्यांना मोबदला मिळाला. मात्र, झुडपी जंगले व खासगी जागेअंतर्गत येणाऱ्यांना कमी मोबदला मिळत असल्याची ओरड होती. अखेर मंत्री सुनील केदार यांनी जलसंपदा विभागामार्फत निधी मंजूर करून गावकऱ्यांना न्याय मिळवून दिला. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. 

गावठाणाप्रमाणेच मोबदला मिळावा, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी होती. जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे यांनी ही मागणी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे वारंवार रेटून धरली. यात तांत्रिक अडचणीमुळे प्रशासन व प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरूच होता. अखेर निधी मंजूर झाला असून, प्रलंबित गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेला वेग आलेला आहे. पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून १२.५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, आमदार सुनील केदार यांनी कोच्छी बॅरेजला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून येथील स्थितीविषयी माहिती घेतली. 

कोच्छी गावात आयोजित कार्यक्रमात मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गावकऱ्यांना सहानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे जी. मो. शेख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अनिता पराते, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे, पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, पंचायत समिती सदस्य भावना चिखले, गणेश काकडे, गोविंदा ठाकरे, सहायक गटविकास अधिकारी दीपक गरुड आदी उपस्थित होते. 

प्रकल्पाची क्षमता व मिळणारा लाभ  -
कोच्छी प्रकल्प एकूण ७५ एमएम क्यूब पाणी साठविण्यासाठी उभारण्यात आला आहे. एकूण क्षमतेपैकी ५७ एमएम क्यूब पाणी हे ४५०० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी राखीव राहणार आहे. यातून महानिर्मितीच्या वीज केंद्रांनाही पुरवठा होणार आहे. यामुळे पेय जलाशयातील ताण कमी होईल व गरजेनुसार पाणी उपलब्ध होऊ शकेल. तसेच नागपूर शहराची तहान भागविण्यासाठीही येथील पाण्याचा वापर होणार असल्याचे समजते. हा प्रकल्प २०१९ ला पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. निधीअभावी काम शेवटच्या टप्प्यात आहे. प्रकल्पात पाणी साठवणे सुरू आहे. मात्र, जलवाहिनीच्या कामानंतरच वापरात येऊ शकते. धरणाच्या वरच्या भागातील पात्र २९९ मीटर इतके असून, धरणाची पातळी ३०२.५ मीटर आहे. 

सर्वेक्षणामध्ये गावातील काही घरे झुडपी जंगलात असल्याचे नमूद असल्याने कमी मोबदला मिळणार होता. त्यामुळे वाद सुरू होता. गावकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर न्याय मिळला. 
- छाया बनसिंगे, जिल्हा परिषद सदस्य  

कोच्छी प्रकल्पाच्या उर्वरित बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे लवकरच प्रकल्प पूर्ण होईल. 
- अनिता पराते, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प विभाग, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT