steel rod.jpg 
विदर्भ

Lockdown : बांधकाम व्यवसायाला सशर्त परवानगी मिळाली, मात्र या मोठ्या अडचणींना जावे लागणार सामोरे

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : नोटबंदी, जीएसटी या सारख्या आव्‍हानांना सामोरे जात सावरत असणारा बांधकाम व्‍यवसाय कोरोनाच्‍या संकटात आणखी अडचणीच्‍या गर्तेत सापडला आहे. लॉकडाउनमध्ये बांधकाम व्‍यवसायाला सशर्त परवानगी मिळाली असली तरी सिमेंट व स्‍टीलची कृत्रिम दरवाढ तसेच परराज्‍यांतील मजुरांनी गावाकडे परतीची वाट धरल्‍याने बांधकाम व्‍यवसाय पुर्णतः अडचणीत सापडला आहे. त्‍यामुळे बांधकाम व्‍यावसायिकांसह त्‍यावर अवलंबून असणारे व्‍यापारीही चिंतेत आहेत.

कृषी क्षेत्रापाठोपाठ सर्वाधिक अर्थचक्रे फिरण्याचे क्षेत्र म्‍हणून बांधकाम व्‍यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, हा व्‍यवसाय गेल्‍या पाच वर्षापासून आव्‍हानांना सामोरे जात आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे बांधकाम व्‍यवसायासमोर अडचणी वाढल्‍या आहेत. त्‍यातूनही हा व्‍यवसाय सावरत असताना कोरोना संसर्गाचे संकट उभे राहिले. राज्‍यात 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. त्‍यामुळे बांधकाम व्‍यवसायावर आधारित सर्व आर्थिक चक्रे पुर्णतः थांबली. 

त्‍याचा फटका बांधकाम व्‍यावसायिकांनीही मोठ्या प्रमाणात बसला आहे. लॉकडाउनच्‍या काळात बांधकामे ठप्‍प असल्‍याने सिमेेंट, स्‍टीलला अजिबात मागी नव्‍हती. मात्र, शासनाने काही अटींवर बांधकाम व्‍यवसायाला सध्या परवानगी दिली आहे. मात्र लॉकडाउनपुर्वी सिमेंटचा प्रति पोत्‍यामागे 280 ते 300 रुपये असलेला दर आज 380 ते 400 रुपयांपर्यत गेलेला आहे. स्‍टीलच्‍या दरातही प्रति किलोमागे दीड ते दोन रुपयांची वाढ झाली असून ही वाढ कृत्रिम असल्‍याचे काही व्‍यावसायिकांकडून सांगण्यात येते. दरम्‍यान बांधकाम व्‍यवसायामध्ये काम करणारे परराज्‍यातील मजूरही लॉकडाउनमध्ये अडकले होते. 

सध्या परराज्‍यातील लोकांना त्‍यांच्‍या गावी पाठवण्याची कार्यवाही सुरु आहे. त्‍यात अनेक बांधकाम मजूर गावी परतले आहेत. त्‍यामुळे कुशल मजूर परराज्‍यात गावी परतल्‍याने बांधकाम व्‍यवसायात यापुढे काही दिवस कुशल मजुरांची कमतरता भासणार आहे. वाढलेले सिमेंट आणि स्‍टीलचे दर पाहता घरांच्‍या किंमतीही वाढण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे  सर्वसामान्‍यांना परवडेल, अशा किमतीत घर मिळण्यास अडथळा निर्माण होण्याची भिती व्‍यक्‍त होत आहे.

मजूर गावी परतल्‍याने मोठ्या अडचणी
नोटबंदी, जीएसटी, रेरा कायद्यापाठोपाठ कोरोनाचे संकट बांधकाम व्‍यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. सध्या बांधकामांना सशर्त परवानगी मिळाली असली तरी स्‍टील व सिमेंटची झालेली कृत्रिम दरवाढ तसेच परराज्‍यांतील मजूर गावी परतल्‍याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. 
- किशोर मोरे, बांधकाम व्‍यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT