Doctors are busy in mobile while giving polio dose to children in Yavatmal
Doctors are busy in mobile while giving polio dose to children in Yavatmal  
विदर्भ

बालकांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती; 'या' गोष्टीकडे होतं डॉक्टरांचं लक्ष

सूरज पाटील

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील कापसी येथे बालकांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी मंगळवारी (ता. दोन) भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देत कारभाराचे ‘ऑपरेशन’केले. कापसी येथे जाऊन अंगणवाडी सेविकेकडून माहिती जाणून घेतली. यावेळी डॉक्टर मोबाइलवर व्यस्त असल्याने घोळ झाल्याची बाब समोर आली.

कापसी येथे बारा बालकांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत सीएसओ, आशावर्कर, अंगणवाडीसेविका, अशा तीन कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. तर, दोन वैद्यकीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सॅनिटायझर प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, स्थायी समिती सदस्य स्वाती येंडे यांनी भांबोरा पीएचसीत धडक दिली. यावेळी मस्टरची पाहणी करण्यात आली. 

आरोग्य सहायक ए. एन. खंडारे अर्जित रजेवर होते. बी. टी. राठोड या प्रशिक्षणावर होत्या. कनिष्ठ साहायक हे कार्यालयात उपस्थित होते. मात्र, त्यांनी मस्टरवर स्वाक्षरी केली नव्हती. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. मसराम, डॉ. महेश मनवर नियमितपणे पीएचसीत उपस्थित राहत नाही. या संदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याचे गटविकास अधिकार्‍यांनी सांगितले. 

कापसी केंद्राची जबादारी डॉ. मसराम यांच्याकडे होती. डॉ. मनवर यांच्याकडे जिल्हास्तरावरील अतिरिक्त प्रभार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच पदाधिकार्‍यांच्या भेटीदरम्यान वैद्यकीय अधिकार्‍यांची दांडी व पीएचसीचा कारभार चव्हाट्यावर आला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कापसी येथे भेट देऊन अंगणवाडीसेविकेला घटनेबाबत विचारणा केली. पोलिओ डोस देण्यापूर्वी उपस्थित डॉक्टरांना दाखविले. मात्र, त्यांनी पोलिओ देण्याचे निर्देश दिले. लसीकरणाच्या वेळी डॉक्टर मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले. तर, भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी राहत नाही. वैद्यकीय अधिकारी दांडी मारत असल्याचे समारे आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, कुणाचीही गय केली जाणार नाही.
-श्रीधर मोहोड
आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT