elderly couple not getting destitute amount from last three years in teosa of amravati
elderly couple not getting destitute amount from last three years in teosa of amravati 
विदर्भ

तहसील कार्यालयाने केली एक चूक अन् ७५ वर्षीय वृद्ध दाम्पत्याला बसला आयुष्यभरासाठी आर्थिक फटका

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : श्रावण बाळ योजना अनुदान हे 65वर्षा खालील महिला व पुरुष वर्गासाठी असून याचा लाभ हा तहसील कार्यालय स्तरावर घेतला जातो. मात्र, याच अनुदानापासून तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील वृद्ध दाम्पत्य गेल्या तीन वर्षापासून वंचित असल्याने ते प्रशासनापुढे अनुदानासाठी दयायाचना करीत आहेत, तर  इतके वर्ष या अनुदानपासून का वंचित ठेवण्यात आले, असाही या वृद्ध दाम्पत्याकडून प्रश्न उपस्थित केला जातो आहे. 

65 वय व त्यावरील वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य सेवानिवृत्ती योजना गट-ब मधून 400 रुपये प्रतीमाह प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते. याचा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन येाजनेचे 200 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 400 रुपये व केंद्र शासनाकडून 200 रुपये, असे एकूण 600 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते. 
ही योजना सर्व सामान्य नागरिक वयोवृद्ध लोकांसाठी तहसील कार्यालयामार्फत राबविली जाते. मात्र, तिवसा तहसीलच्या एका चुकीच्या अहवालामुळे 75वर्ष पार झालेल्या वृद्ध दाम्पत्यांचे तीन वर्षापासून श्रावण बाळ योजनेचे अनुदानच बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तम बळीराम फटिंग (वय 75) तर त्यांच्या पत्नी सरस्वती उत्तम फटिंग (वय 70) असे या वृद्ध दाम्पत्यांचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःची काही शेती असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आधी मिळत असलेल्या अनुदानामुळे त्यांना थोडा हातभार लागत होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हे अनुदान रोखल्याने इतक्या वयात उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे श्रावण बाळ योजनेचे अनुदान मिळविण्यासाठी हे वृद्ध आजही तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहे, तर तीन वर्ष आमचे अनुदान का रोखण्यात आले? हा देखील सवाल या वृद्ध दाम्पत्यांकडून उपस्थित केला जातो आहे. 

तीन वर्षांपूर्वी तलाठी यांचा अहवालात मुलगा नोकरी असल्याचे सांगून फटिंग यांचे श्रावण बाळचे अनुदान रोखण्यात आले होते, उत्तम फटिंग यांना एक विवाहित मुलगा असून ते एका खासगी संस्थेवर मानधन तत्वावर काम करत होते. मात्र, ते काम सुद्धा आता बंद झाले, तर संस्थेने 2018 मध्येच हंगामी अस्थायी प्रकारच्या कामावर असल्याचे पत्र दिले होते. मात्र, तरी सुद्धा आजपर्यंत फटिंग यांना श्रावण बाळचे अनुदान मिळाले नाही. 

गेल्या तीन ते चार वर्षांपासून आमचे अनुदान बंद आहे. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा श्रावण बाळचे अनुदान मिळत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. माझ्याकडे दोन एकर शेती असून शेतीवरच उदरनिर्वाह होतो. तेव्हा प्रशासनाने सांगावे की ही योजना नेमकी कुणाला लागू होते. 
-उत्तम फटिंग, शिरजगाव, मोझरी. 

वृद्ध दाम्पत्य शासकीय योजनेचे लाभार्थी असूनही त्यांना चुकीचा अहवाल देत लाभापासून वंचीत ठेवल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. शिवाय गेल्या तीन वर्षातील योजनेतील लाभाच्या पैशांची प्रशासनाने भरपाई देऊन फटींग वृद्ध दाम्पत्याला न्याय द्यावा
- कल्याण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शिरजगाव. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT