eleven crore and fifty lakh need to expend in sixty days in yavatmal 
विदर्भ

साठ दिवसांत खर्च न केल्यास साडेअकरा कोटी शासनाला जाणार परत, अनेक कामांचे प्रस्ताव धूळखात

चेतन देशमुख

यवतमाळ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजुरीअभावी 57 कामांचे प्रस्ताव धूळखात पडले आहेत. या कामांसाठी साडेअकरा कोटींची तरतूद असून, मंजुरी नसल्याने हा निधी शासन समर्पित होण्याच्या मार्गावर आहे. निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, 31 मार्चपूर्वी निधी खर्च करण्याचे आदेश आहेत. 

यवतमाळ नगरपरिषदेने 2020-21मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्तीसुधार योजनेअंतर्गत अनेक विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. 30 डिसेंबर 2017च्या सर्वसाधारण सभेत त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. नगरपालिकेने मंजुरी दिलेल्या कामांना जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही मान्यता दिली आहे. त्यानुसार या कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑक्‍टोबर 2020 रोजी नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. 57 कामांसाठी 11 कोटी 51 लाख 33 हजार 634 रुपये किमतीची तरतूद आहे. मात्र, अजूनही कामांना मंजुरी मिळालेली नाही. विकासनिधीच्या खर्चाची अंतिम मुदत राज्य शासनाने जारी केली आहे. मार्च 2021पर्यंत हा निधी नगरपालिकेला खर्च करावा लागणार आहे. पालिकेच्या हातात केवळ साठ दिवसांचा कालावधी आहे. या कामांची निविदाप्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. त्याला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय ठेवावा लागणार आहे. सभागृहाची मंजुरी घेऊन मार्चच्या पूर्वी ही कामे करावयाची आहे. हातात असलेल्या दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करणे मोठे जिकरीचे काम आहे. मुदतीत सर्व मंजुरी घेऊन कामास सुरुवात न झाल्यास तब्बल साडेअकरा कोटींचा निधी परत जाण्याची भीती आहे. कोरोनामुळे या वर्षात विकासकामे थांबली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे आता या कामांना गती देण्याची मागणी नागरिक व नगरसेवकांची आहे. साडेअकरा कोटी रुपयांतून शहरात चांगली कामे होऊ शकतात. त्यामुळे 57 कामांना तातडीने मंजूरी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

कोरोनामुळे विकासकामांचा निधी मिळाला नाही. त्यात आता नागरीवस्ती सुधार योजनेची कामे निधी असतानाही थांबली आहेत. साडेअकरा कोटींमधून 57 कामे होणार आहेत. या कामांना मंजुरी न मिळाल्यास साडेअकरा कोटींचा निधी परत जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. निधी खर्च करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी व समाजकल्याण सहसंचालक यांना दिले आहे.
- प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, नगरसेवक, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ठाकरेंच्या शिलेदारांचा महायुतीशी सामना, मुंबईत दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार; कोण-कुठे लढणार?

Ruturaj Gaikwad: 'ऋतुराजला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा विराट आणि रोहित वनडेत...', R Ashwin नेमकं काय म्हणाला?

Election: निवडणूक की सत्तेचा सौदा? मतदारांचा विश्वास तुटतोय, मतदान टक्केवारी कमी होणार? मनपा निवडणुकांपूर्वीच प्रश्नचिन्ह

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने संपत्तीत होईल वाढ

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT