farmer commit to suicide in pandharkawada of yavatmal
farmer commit to suicide in pandharkawada of yavatmal 
विदर्भ

घर गहाण ठेवून घेतले कर्ज, पण धनादेश न वटल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सूरज पाटील

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : फायनान्स कंपनीकडे शेतकऱ्याने आपले राहते घर गहाण ठेवून कर्ज घेतले. मात्र, कंपनीच्या वतीने दिलेला धनादेश बँकेत दोनवेळा वटला नाही. कोरोनाची पार्श्वभूमी आणि परिस्थितीशी संघर्ष करीत असलेल्या तरुण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान शनिवारी (ता. २८) शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील जिरा (मीरा) येथे घडली. 

श्‍यामसुंदर शंकर टेकाम (वय ४०) असे मृताचे नाव आहे. वडील शंकर टेकाम यांच्या नावाने तीन एकर शेती असून पत्नीच्या नावे नऊ अशी १२ एकर शेती त्यांच्याकडे आहे. आईवडील वयोवृद्ध असल्यामुळे श्‍यामसुंदर हाच शेतात राबायचा. शासनाच्या वतीने सन २०१६ मध्ये झालेल्या कर्जमाफीचा लाभदेखील त्यांच्या कुटुंबाला मिळाला नव्हता. श्‍यामसुंदर यांनी यवतमाळ येथील एका खासगी फायनान्स कंपनीकडे घर गहाण ठेवून कर्ज मंजूर करून घेतले. कंपनीच्या वतीने त्यावेळी एक लाख रुपयांचा धनादेश शेतकऱ्यास देण्यात आला होता.

कंपनीने दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. दुसरा धनादेश देखील वटत नसल्याने चिंतातूर शेतकरी सतत फायनान्स कंपनीचे उंबरठे झिजवत होता. यामध्ये आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच शामसुंदरने बुधवारी (ता.25) सायंकाळी शेतात कीटकनाशक पिऊन घरी पोहोचला. थोड्यात वेळात त्याला उलटी होत असल्यामुळे त्याला करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंतानजक असल्याने उमरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. फायनान्स कंपनीने दिलेला धनादेश वटत नसल्याने मुलाने आत्महत्या केल्याची संतप्त प्रतिक्रिया वडिलांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT