farmers must collect soybean seeds for next year sowing  
विदर्भ

शेतकऱ्यांनो, पुढील हंगामात पेरणीसाठीही मिळणार नाही सोयाबीन; आतापासूनच करा सोय

सुधीर भारती

अमरावती : पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे बियाणे मिळण्यात अडचणी जाणार आहेत. त्यामुळे पेरणीसाठी आवश्‍यक इतके यंदा उत्पादित चांगल्या प्रतीचे सोयाबीन जपून ठेवल्यास संभाव्य अडचणींवर मात करता येणार आहे. अन्यथा पुढील हंगामात पुन्हा बियाणे टंचाईसह खराब किंवा कमी प्रतीचे बियाणे खरेदी करून नुकसान सहन करण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे.

यावर्षी खरीप हंगामात मॉन्सून परतीच्या पावसाने सोयाबीन काढणीच्या अवस्थेत नुकसान होण्यासोबतच प्रत खालावली आहे. सोबतच यंदा सोयाबीन बियाणे खराब असल्याच्या व त्यामुळे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्याने कंपण्यांविरोधात कारवाई प्रस्तावित आहे. या कंपन्या पुढील हंगामात बियाणे विक्रीसाठी ठेवणार नाहीत किंवा कमी प्रमाणात ठेवण्याची शक्‍यता असल्याने पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार आहे.

सोयाबीन लवकर येणाऱ्या जाती पावसात न सापडल्याने ते बियाणे चांगले आहे. तेच शेतकऱ्यांनी  जतन करून ठेवावे. सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची गरज नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे, त्यांनी दर महिन्याला घरच्या घरी उगवण क्षमता तपासून आपल्या स्वत:ला आवश्‍यक असणारे व आपल्या नातेवाइकांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास संभाव्य अडचणीवर मात करता येणार आहे. शक्‍य असल्यास गावातील शेतकऱ्यांना बाजार भावाने बियाणे विकल्यास त्यांचीही सोय होणार आहे.

आताही तयार करता येईल बियाणे - 
ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे व काही प्रमाणात शेत रिकामे असेल अशांनी 15 जानेवारीपर्यंत अर्धा ते एक एकर क्षेत्रावर फक्त बिजोत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करावी. त्याची चांगली देखभाल केल्यास पन्नास टक्के उत्पादन हमखास येऊ शकते. त्यातून चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होऊ शकेल. उन्हाळी सोयाबीनची उगवणक्षमता चांगली असल्याने खरीप हंगामामध्ये 22 ते 25 किलोच एकरी सोयाबीन पेरणीकरिता लागेल व यामुळेसुद्धा उत्पादन खर्चात बचत होईल.

शेतकऱ्यांनी आताच सावध व्हावे -
संभाव्य टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी आताच सावध होणे गरजचे असून पुढील हंगामाची तयारी सुरू करावी व मार्गदर्शनासाठी कृषी विभागासोबत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : RBI रेपो रेटच्या निर्णयाआधी सोनं-चांदीत मोठी घसरण! आज किती स्वस्त झालं? पाहा ताजे भाव

Pune Weather Update : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुढील दोन दिवस हवामान स्थिर

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

UPSC CSE 2026 New Rule : यूपीएससीने नियम बदलला! आता 'या' उमेदवारांना एकदाच देता येणार परीक्षा...

Pune Mumbai Flight : पुणे-मुंबई विमानसेवा ‘जमिनीवर’, कंपन्यांची उदासीनता; वेळ चुकीची असल्याने प्रवाशांची पाठ

SCROLL FOR NEXT