The father who exploited the girl is absconding 
विदर्भ

सावत्र बापाने केले मुलीचे लैंगिक शोषण; तक्रारीवरून गुन्हा दाखल

संतोष ताकपिरे

अमरावती : सावत्र पिताच मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चाईल्डलाइनच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आले. परंतु, गुन्हा दाखल झाल्यापासून सावत्र वडील फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात मुलांच्या मदतीसाठी चाईल्डलाइनचे सदस्य अमरावती शहरातील प्रत्येक भागात घरोघरी संपर्क साधत होते. त्याअनुषंगाने एका भागात जनजागृती करीत असताना १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी पदाधिकाऱ्यांना द्विधा मन:स्थितीत दिसली. तिच्यासह आईला विश्वासात घेऊन मुलीबाबत चौकशी केली असता बऱ्याच गोष्टी पुढे आल्या.

आईचे पहिले लग्न झाले होते. परंतु, पती मारहाण करून त्रास देत होता. ती गर्भावस्थेत असताना पतीने घटस्फोट दिला. २००९ मध्ये मुलगी झाली. २०१२ मध्ये तिची दुसऱ्याशी ओळख झाली. त्या व्यक्तीसोबत २०१८ मध्ये साध्या पद्धतीने दुसरे लग्न केले. ऑगस्ट २०२० मध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास सावत्र पित्याने अश्‍लील चाळे केल्याने चिमुकली रडत होती.

तिने आईजवळ सावत्र पित्याच्या वर्तणुकीची माहिती दिली. पीडित मुलगी व तिच्या आईचे समुपदेशन केले असता तिने मुलीचा सावत्र पित्याकडून छळ सुरू असल्याची सांगितले. या छळाला ती कंटाळली होती. भीतीपोटी कुणाकडे वाच्यता केली नाही.

मुलीला व तिच्या आईला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. चाईल्डलाईन सदस्यांनी राजापेठ ठाणे गाठून पित्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल केली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरुवातील त्याने केला बचाव

पहिल्यांदा मुलीने आईला माहिती दिली. आईने जाब विचारला असता सावत्र पित्याने पहिल्यांदा माफी मागून स्वत:चा बचाव केला. अन्‌ काही दिवसांनी तीच कृती परत केली.

तत्काळ गुन्हा दाखल
प्रकरणी गंभीर असल्याने तत्काळ गुन्हा दाखल केला. फरार सावत्र पित्याला शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.
- किशोर शेळके,
प्रभारी पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT