Fear among citizens about testing Corona, many give wrong mobile number
Fear among citizens about testing Corona, many give wrong mobile number 
विदर्भ

कोरोना संसर्गापेक्षा तपासणीचाच धसका, पत्ता खोटा, मोबाईल नंबरचाही घोळ

दीपक फुलबांधे

भंडारा : कोरोनाची चाचणी केल्यास रिपोर्ट पॉझिटिव्हच येतो, अशी धास्ती नागरिकांमध्ये वाढत आहे. यामुळे चाचणीच करायची नाही, असे ठरवून अनेक जण आजार अंगावर काढत आहेत. परंतु यामुळे ते स्वतःसोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. धक्कादायक म्हणजे कोव्हिड तपासणीच्या ठिकाणी अनेक जण चुकीचे पत्ते किंवा मोबाईल नंबर देत असल्याचेही उघडकीस आले आहे. वाढत्या कोरोनाच्या काळात नागरिकांची ही कृती जीवघेणी आहे.   

भंडारा जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगात वाढत असून, मृतांचीही संख्या वाढत आहे. मात्र, कोरोनाबाबत गैरसमज आणि पसरलेल्या अफवांमुळे कोणीही तपासणीसाठी समोर येत नाही. त्यातही चुकीची माहिती दिली जात असल्याने रुग्णाच्या संसर्गातील व्यक्तींचा शोध घेण्यास आरोग्य विभागासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सध्यातरी कोरोना संक्रमण थांबण्याची लक्षणे दिसत नाही.

कोरोना आजाराची लागण थांबवण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरून लॉकडाउन, जिल्हाबंदी, जमावबंदी असे अनेक उपाय करण्यात आले. त्यामुळे तीन महिने दुकान, व्यवसाय ठप्प झाल्याने बाजारातील उलाढाल पूर्णपणे बंद झाली होती. आता हळूहळू व्यवसाय, उद्योग, बाजार सुरू होत असतानाच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ऑगस्ट महिन्यापासून मृतांची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे अधिक तपासण्या करून बाधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवून उपचार करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. परंतु, कोरोना आजारापेक्षा लोकांनी तपासणीचाच अधिक धसका घेतला आहे. 

तुमसर, मोहाडी, भंडारा या हॉटस्पॉट ठरलेल्या गावांत कोरोना आजाराबाबत अनेक गैरसमज आणि अफवा दिसून येतात. एकदा पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती दुसरा निगेटिव्ह अहवाल मिळवण्यास धडपड करतो. परंतु, प्रयोगशाळेतील तपासणी व अँटीजेन तपासणीतील फरक समजण्याचा प्रयत्न करत नाही. अशा हट्टापायी आपल्या कुटुंबीयांना बाधित करतो आहे. त्यातही ग्रामीण व शहरी भागातील लोक तपासणीसाठी समोर येत नाही.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

एखाद्या बाधिताच्या संपर्कातील व्यक्तीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. परंतु, अहवाल आल्यावर त्याचा पत्ता व मोबाईल क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून येते. त्यामुळे त्याच्यासोबत संपर्क साधता येत नाही. दुसरीकडे एक बाधित व्यक्ती दिवसभरात कितीतरी निरोगी लोकांपर्यंत कोरोना आजाराचा प्रसार करत असल्याने धोका दिवसेंदिवस वाढत आहे. 

उपचाराबाबत गैरसमज

कोरोनाची लागण परप्रांतातून व महानगरातून आलेले कामगार, विद्यार्थी व नागरिकांद्वारे एप्रिल महिन्यापासून झाली. रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तीला विलगीकरणात ठेवून उपचार केले जातात. मात्र, शासनाकडून निधी मिळवण्यासाठी हे सगळे केले जाते, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. त्यातही बाधित झाल्यावर कुटुंबापासून वेगळे जिल्हा रुग्णालयात ठेवले जाते. तेथे अनेकांचा काहीही झाले नसताना मृत्यू होतो, याबाबतच्या चर्चा पसरल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला लोकसंख्या कमी करण्यासाठी कोरोनाची लागण झाल्याचे सांगतात. तसेच मृतदेह नातेवाइकांना दिले जात नसल्याने त्याबाबतही अनेक प्रकारच्या चर्चा समाजात आहेत. यामुळे सामान्य व्यक्तीही प्रभावित होत आहे. 

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT