Filed a case of molestation against a young man out of one-sided love 
विदर्भ

एकतर्फी प्रेमाची गाडी पुढे सरकलीच नाही; आता पोलिस त्याच्या शोधात 

संतोष ताकपिरे

अमरावती : कुणी एखादी आवडली की, मागचा पुढचा विचार न करता, तिच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला जातो. असे प्रस्ताव अनेकांना महागात पडतात. त्याचेही तसेच झाले. तिने त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला तर नाहीच, उलट त्रास अनावर झाल्याने त्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस कारवाईने तो फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. 

रोशन साहेबराव लोखंडे (वय 30) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. जिल्ह्यातील एका आरोग्य केंद्रात 27 वर्षीय युवती वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून रोशनने तिच्याशी संपर्क साधला. पुण्याला जायचे असल्यामुळे कोविड आरोग्य तपासणी प्रमाणपत्र हवे असल्याचे कारण त्याने सांगितले. त्यासाठी त्याने अनेकदा संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्याने रोशनची आरोग्य तपासणी करून त्याला फिटनेस प्रमाणपत्रसुद्धा दिले. 

त्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. कारण त्याच्या मनात तिच्याबद्दल वेगळीच खलबते सुरू होती. प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क साधून, प्रमाणपत्र तर एक बहाणा आहे... मी खास तुला भेटायला आलोय.. तुझ्यासोबत काही खासगीत बोलायचे आहे.. तू खूप आवडतेस, असे एक नव्हे अनेक वाक्‍य उच्चारून महिला अधिकाऱ्याचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु एखादी व्यक्‍ती आपल्याला आवडते म्हणून आपणही तिला आवडत असू, असे कदापि होत नाही. 

रोशन सोबतही तेच झाले. महिला अधिकाऱ्याला त्याचे प्रेम म्हणून निव्वळ मूर्खपणा वाटत होता. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो समजण्याच्या पलीकडे होता. वारंवार होणाऱ्या त्याच त्या प्रकारामुळे महिला अधिकाऱ्याला राग आला. रोशनच्या अशा गैरवर्तनामुळे ती जाम चिडली. पुन्हा पुन्हा त्याची समजूत काढली. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला सांगून पाहिले. परंतु, त्याने समजूत काढणाऱ्यांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे सारेच संतापले. रात्री पुन्हा रुग्णालयात जाऊन रोशनने गैरवर्तन केले. त्रासलेल्या महिला अधिकाऱ्यांनी अखेर पोलिसांत तक्रार केली. 
 

आरोपी फरार 
अनेकदा समजावून तो समजायला तयार नव्हता. विनयभंग, जीवे मारण्याची धमकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रोशन लोखंडे फरार झाला असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. 
- एस. पी. पाटील, पोलिस निरीक्षक 

संपादित : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : महिला IPS प्रकरणात रोहित पवारांनी अजितदादांची बाजू घेतली की टोमणा मारला? नेमकं काय म्हणाले?

Korean Kimchi: आंबट तिखट अन् खमंग चवीचं कोबीचं लोणचं म्हणजेच कोरियन किमची नक्की आहे तरी काय?

कुत्र्यामुळे मोडला संसार! बॉलिवूड अभिनेत्याच्या लग्न मोडण्याचं कारण ठरला कुत्रा, नक्की काय झालेलं...

Nashik News : मविप्र विद्यापीठाबाबत गैरसमज कशासाठी? संस्थेचे थेट स्पष्टीकरण!

Shivraj Bangar On Laxman Hake: 'ज्या गावच्या बोरी त्याचं गावच्या बाभळी असतात' | Sakal News

SCROLL FOR NEXT