Grandmother Dhaba in Nagpur needs help 
विदर्भ

साठ वर्षीय आजीला प्रसिद्धीची नाही तर दोन वेळच्या जेवणाची आहे गरज; लहान गाडीचा व्यवसाय पडला बंद

अथर्व महाकांळ

नागपूर : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात कोण कधी फेमस होईल, हे सांगता येत नाही. कधी कोणाचा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे सांगता येणार नाही. सध्या ‘बाबा का ढाबा’ची देशभरात चांगलीच चर्चा होत आहे. मटर-पनीरसोबत पराठे विकणाऱ्या या बाबाच्या दुकानाबाहेर जत्रा भरत आहे. सोशल मीडियामुळे ढाबावाले बाबा चर्चेत आहेत. परंतु, अशी गरज अनेक गरजवतांना आहे. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.

राज्यात, विदर्भात इतकेच काय तर आपल्या शहरात बाबा का ढाबासारखे अनेक असे व्यावसायिक आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त इतरांचे पोट भरून चालतो. मात्र, कोरोनामुळे त्यांच्याकडे कोणीही फिरकत नाही. आता त्या सर्वांना आर्थिक आधाराची गरज आहे. ज्याप्रमाणे सोशल मीडियाने ‘बाबा का ढाबा’ला जगात प्रसिद्ध केलं त्याचप्रमाणे इतर गरजू लोकांनाही सोशल मीडियामुळे मदतीचा हात मिळेल? या प्रश्नाचे उत्तर आता प्रत्येकाने देण्याची गरज आहे.

नागपुरातील सर्वात जुन्या महाल भागात असाच एका आजीचा ढाबा आहे. खरेतर हा ढाबा नसून एक लहान गाडी आहे. पोटापाण्यासाठी ही आजी येथे डोसा आणि इडली विकते. विशेष म्हणजे आजच्या महागाईच्या काळातही ही आजी दहा रुपयाला चक्क चार डोसा देते. कोरोनामुळे या आजीचाही व्यावसाय डबघाईला आला आहे. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.

नागपुरातीलच तुळशीनगरात पुरोहित नावाची वहिणी राहतात. कोरोनामुळे त्यांचाही टिफीनचा व्यवसाय बंद पडला आहे. ते राहत असलेल्या किरायाच्या घराचे भाडच जास्त आहे. मात्र, व्यवसाय बंद पडल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असे एक ना अनेक छोट्या व्यावसायिकांना मदतीचे नितांत गरज आहे. त्यांना प्रसिद्धीची नाही तर मदतीची गरज आहे. आपला व्यवसाच चालावा हीच त्यांची इच्छा आहे.

‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यांत आलेले पाणी पाहून अनेकांच्या डोळ्यांना पाणी आले. यामुळेच त्यांच्या दुकानासमोर आता खवय्यांची लांब रांग लागत आहे. अख्ख्या देशाने ‘बाबा का ढाबा’ला आर्थिक मदत केली. आता हा ढाबा झोमॅटोवर देखील आले आहे. ही आहे सोशल मीडियाची खरी पावर...

सोशल मीडिया मानवी जीवनात किती मोठा बदल घडवून आणू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. नागपुरातील या छोट्या व्यावसायिकांना असे प्रकाशझोतात यायचे नाही तर फक्त पोट भरायचे आहे. तुमची एक छोटीशी मदत त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो.

स्थिती बदलाला लागेल आणखी वेळ

मार्च महिन्यात कोरोना नावाचा व्हायरस भारतात आला आणि १३० कोटी लोकसंख्या असलेला आपला देश अवघ्या काही दिवसांत लॉकडाऊन झाला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता ‘हा कोरोना जाणार कधी?’ पण देशात काही लोक असेही होते ज्यांच्यापुढे फक्त एक नाही तर प्रश्नांचा आणि समस्यांचा अख्खा डोंगर होता. लहान व्यवसाय, त्यात कसाबसा उदरनिर्वाह करणारे हे लोक अक्षरशः हा डोंगर सर करण्याचा प्रयत्न करताना दिवसेंदिवस खचत चालले होते. तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला, पण ही परिस्थिती किंचितही बदलली नाही.

छोटीशी मदत आणणार चेहऱ्यावर हास्य

तुमच्या घराजवळ किंवा शहरात कुठेही असे गरजू व्यावसायिक दिसल्यास त्यांच्याकडून नक्की काहीतरी विकत घ्या किंवा त्यांनी तयार केलेल्या पदार्थांच आस्वाद घ्यायला विसरू नका. तसेच तुमचा फोटो घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करायलाही विसरू नका. तुमची छोटीशी मदतही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT