how to apply online for farmer scheme  
विदर्भ

फक्त एका क्लिकवर सर्व शेतकरी योजनांचा लाभ, कसा कराल ऑनलाईन अर्ज?

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : एका अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीवर अर्ज मागविण्यात आले होते. योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. ती आता वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी पाटील यांनी दिली. मात्र, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याबाबत माहिती आहे काय? 

कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलवर पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेचा अर्ज करता येईल. त्यात ठिबक सिंचन संच आणि तुषार सिंचन संच याचा समावेश आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील चार हजार 600 हून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत असलेल्या योजनांसाठी सहाशेहून अधिक अर्ज आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी दिली.

कसा कराल अर्ज? -

  • शेतीसंबंधी सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. यामध्ये 'शेतकरी योजना' (farmer scheme) हा पर्याय निवडावा.
  • सर्व योजनांपैकी आपल्याला ज्या योजनेचा लाभ हवा आहे त्याचा अर्जामध्ये समावेश करायचा आहे. 
  • शेतकऱ्यांनी अर्ज करताना २० रुपये शुल्क व ३.६० रुपये जीएसटी मिळून एकूण २३ रुपये ६० पैसे ऑनलाइन शुल्क भरायचे आहे. त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाईल. 
  • 'वैयक्तीक लाभार्थी' म्हणून अर्ज करणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर लिंक करावा. आधार प्रमाणित केल्याशिवाय त्यांना अनुदान देता येणार नाही.
  • शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. आधी अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. ती मुदत आता 11 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी माहिती सादर केलेल्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्‍यकता नाही. मात्र, लाभाच्या घटकांमध्ये शेतकऱ्यांना बदल करता येणार आहे. अर्ज करण्याची संधी असल्याने कृषिविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी मुदतीपर्यंत अर्ज करू शकतील. 

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे -

  • आधारकार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक  
  • शेतीचा सातबारा 
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती च्या लाभार्थ्यांना जातीचा दाखला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat : निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचे बाशिंग! पालकमंत्री शिरसाट यांच्या पुत्राला शुभेच्छा देणारे शहरात झळकले होर्डिंग्ज

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात कंटेनरची तीन वाहनांना धडक, भोस्ते घाटातील घटना

Jitendra Awhad: जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्याची ठाण्यात पुनरावृत्ती, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Latest Marathi News Live Update : माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पुत्रांचा आज भाजपमध्ये प्रवेश

Finnish Food : हेल्दी आणि ट्रेडिशनल! फिनलंडचे ‘फिनक्रिस्प’ आणि ‘पुला’ ब्रेड का आहेत खास?

SCROLL FOR NEXT